जागतिक महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांचा हृद्य सत्कार
नागपूर शहर प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांचा हृद्य सत्कार
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूरः (दि ८ मार्च) शहरात टिळक पत्रकार भवन ट्रस्टच्या वतीने व नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक महिला दिनानिमित्त, ८ मार्च रोजी प्रेस क्लब, सिव्हिल लाईन्स येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये महिला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक एस.एन. विनोद होते तर प्रमुख अतिथी म्हणून मनपा स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानी दाणी वखरे उपस्थित होत्या.
पत्रकारितेच्या क्षेत्रात दीर्घकाळ काम केलेल्या महिला पत्रकारांना यावेळी गौरवान्वित करण्यात आले. यात भाग्यश्री शर्मा (लोकमत समाचार), अश्विनी म्हारोळकर-पाचखेडे (सकाळ), भाग्यश्री राऊत (बीबीसी) व देवश्री भिमटे- मेश्राम (युसीएन) यांना पुरस्कृत करण्यात आले. दरवर्षी सामाजिक क्षेत्रातील एका ज्येष्ठ महिलेस स्त्री गौरव पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती छाया खोब्रागडे यांना प्रदान करण्यात आला. तसेच श्रीमती शोभा विनोद स्मृती पुरस्काराने अंकिता देशकर (द इंडियन एक्सप्रेस) यांना सन्मानित करण्यात आले. पत्रकारपत्नी या श्रेणीत पल्लवी केवल जीवनतारे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कामगिरीकरिता सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शिरीष बोरकर, ब्रम्हाशंकर त्रिपाठी, धमेंद्र जोरे, जोसेफ राव, विवेक पुराडभट, शेखर सोनी, रणजीत देशमुख, मनोहर कोठेकर आणि वर्षा बाशू यांची उपस्थिती होती.



