Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखमहाराष्ट्रमुंबईसाहित्यगंध

‘उघडा डोळे बघा नीट’ या आहेत आपल्याच मुली ‘तोकड्या कपड्यात’

तृप्ती पाटील (लेखिका) मालाड, मुंबई

0 4 8 2 9 0

‘उघडा डोळे बघा नीट’ या आहेत आपल्याच मुली ‘तोकड्या कपड्यात’

मुलींचे कपडे आणि त्याबाबत पालकांची भूमिका हा विषय आजच्या काळात सामाजिक व कौटुंबिक पातळीवर अत्यंत संवेदनशील बनला आहे. बदलती जीवनशैली, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आणि सोशल मीडियाचा वाढता वापर, यामुळे फॅशनच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत मुली आधुनिक किंवा तोकडे कपडे परिधान करताना पालकांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते.

पूर्वी कपडे म्हणजे शरीर झाकण्याचे साधन अशी संकल्पना होती. आज मात्र फॅशनच्या नावाखाली कमी कपडे घातले म्हणजे सौंदर्य वाढते, असा गोड गैरसमज काही प्रमाणात रूढ होताना दिसतो. या बदलत्या विचारसरणीत पालकांचा धाक कमी होत चालला आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. काही वेळा आई-वडीलच नकळतपणे किंवा जाणूनबुजून मुलींना अशा फॅशनसाठी प्रोत्साहन देताना दिसतात. आज सोशल मीडियावर लहान वयातील मुली कमी कपड्यांमध्ये व्हिडिओ बनवताना दिसतात. असे व्हिडिओ लाखो लोक पाहतात, मात्र याचा त्यांच्या भवितव्यावर काय परिणाम होईल? याचा विचार अनेकदा केला जात नाही. उद्या याच मुलींच्या आयुष्याशी, त्यांच्या विवाहाशी किंवा सामाजिक प्रतिमेशी हे सगळे जोडले जाणार आहे, याची जाणीव पालकांनी ठेवणे गरजेचे आहे.

इथे प्रश्न कमी कपडे घालण्याचा नसून, त्यातून निर्माण होणाऱ्या विकृत मानसिकतेचा आहे. पालकांनी आपल्या मुलींना समज देणे आवश्यक आहे, की कोणत्या ठिकाणी कोणते कपडे योग्य आहेत. कसे वागावे? कसे बोलावे आणि समाजात कसे वावरावे? ही सामाजिक जाणीव मुलींमध्ये निर्माण करणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलींना फॅशन करण्यापासून रोखण्याचा मुद्दा नाही; मात्र त्या फॅशनमध्ये सभ्यता, संस्कार आणि सुरक्षिततेचा समतोल असावा. भारतीय संस्कृतीशी सुसंगत अशी फॅशन असावी, ज्यामुळे समोरचा व्यक्ती मुलीकडे वाईट किंवा विकृत नजरेने पाहणार नाही. आज घरातसुद्धा मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करणे आवश्यक आहे. घरात असताना, डिलिव्हरी बॉय, कुरिअरवाला किंवा अनोळखी व्यक्ती आल्यास कसे वागावे, स्वतःची सुरक्षितता कशी जपावी, याचे मार्गदर्शन पालकांनी आपल्या मुलींना करणे अत्यंत गरजेचे आहे.

पालकांनी मुलींचे लाड जरूर करावेत, त्यांना स्वातंत्र्य द्यावे; पण कपड्यांच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन करणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. काळानुसार बदल स्वीकारणे गरजेचे असले तरी; त्या बदलांमुळे मुलींची सुरक्षितता धोक्यात येणार नाही, याची खबरदारी पालकांनी घेतली पाहिजे.
मुलगी कितीही शिकलेली, सुसंस्कृत किंवा मोठ्या पदावर कार्यरत असली, तरी तिने आपले चारित्र्य, आत्मसन्मान आणि स्त्रीत्व जपले पाहिजे. हे मूल्य रुजवण्याचे काम पालकांनीच केले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने “मुलगी शिकली, देश घडला” ही संकल्पना साकार होऊ शकते आणि पालकांची जबाबदारी पूर्णत्वास जाईल. देशाची सांस्कृतिक परंपरा जर टिकवून ठेवायची असेल तर, लागलीच मुलींच्या या अशा बीभत्स दिसणा-या तोकड्या कपड्यावर पालकांनी मार्ग काढायला हवा. कारण, पालकाची, समाजाची ‘इज्जत’ या आपल्याच मुली चव्हाट्यावर आणायला मागे पुढे पाहणार नाही. बेआब्रू झालेल्या पालकांना समाज सतत टोमणे देत अपमानाने मान खाली घालायला लावेल. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही, आवारा आपल्या मुलींना आणि सामाजिक बांधिलकी जपून भारतीय संस्कृती लयास जाण्यापासून वाचवा.

तृप्ती पाटील (लेखिका)
मालाड, मुंबई

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे