बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*
*🥀विषय : तुझं असणं🥀*
*🍂बुधवार : १८ / मार्च /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २१० साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*
ऐनवेळी मोगरा,फुलायला थांबला।
नभात चंद्र माझा ,मनी खिन्न वाटला।।
तुझं असणं ईथे ,महत्वाचे मजला।
परक्यास पाहूनी ,कंठ माझा दाटला।।
तुझ्याविन मनाला, कुठे नाही आनंद।
दुःखाला झुगारूनी,जगतो जीवनाला।।
फुलपाखरापरी ,भिरभिरतो तरीही।
पाकळ्यांनी कधी,पंखी नाही झाकला।।
जाणीव सदा होते,त्या वेचल्या क्षणांची।
स्पंदने तुझे गडे ,लाभे या ह्रदयाला।।
जिंन्दगी सोडून मी, भागलो नाही कधी।
संसार भूवरी या, सुखाने मी थाटला।।
सुगंध दरवळे ,जरी दिशात दाही।
तु नसल्याने तेथे ,विषारी मम जाहला।।
जाई जुही मोगरा , धुंद फुलून घ्यारे।
वादळ खंत नाही,जीव त्याने तारला।।
*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा.जि यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*
तुझं असणं जणू अमूर्त स्पंदन
मनगर्भी दरवळणारा सुवास
नजरेच्या काठावर थांबलेलं
एक निनादहीन मधुर प्रकाश… ॥१॥
अंतराच्या अथांग लाटांवर
तुझी स्मृती नौका बनते
हरवलेल्या क्षणांच्या वाळवंटात
तुझी चाहूल सर बनते… ॥२॥
शब्दांच्या पल्याड जपलेले
भावांचे गूढ अवकाश
तुझ्या निःशब्द सहवासाने
साकारतो अंतरीचा निवास… ॥३॥
सांजवेळेच्या म्लान किरणांत
तुझं अस्तित्व झिरपत राहतं
अंधाराच्या गहिऱ्या कुशीतही
तुझं तेज उजळत राहतं… ॥४॥
निःशब्दतेच्या वीणेवरती
तुझ्या स्मृतींचे स्वर झंकारतात
मनाच्या गूढ गाभाऱ्यात
अनामिक नाते उमलत जातं… ॥५॥
अंतराच्या रेषा विरघळून
जिव्हाळ्याचा सेतू घडतो
तुझं असणं एवढंच पुरेसं
जगण्याला अमरत्व देतो… ॥६॥
*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*
तुझं असणं म्हणजे
शांत सरीचं गोड गाणं
दुपारी उन्हाच्या पाऱ्यात
थंड सावलीचं विसावणं
तुझं असणं म्हणजे
शब्दाविनाचं बोलणं
डोळ्यातून उमलणारं
नात्याचं कोमल फुलणं
तुझं असणं म्हणजे
रात्रीचं उजेडात रूपांतर
अंधारातही सापडणारं
आशेचं छोटंसं अंतर
तुझं असणं म्हणजे
श्वासात मिसळलेले गीत
जगणं सोपं करणारी
अनमोल प्रीत मनमीत
तुझं असंच असणं राहो
मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात
कारण तू असलीस ही
आयुष्य जाईल आनंदात
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*
जग विरोधात असू दे कितीही ,
तुझं असणं पाठीशी , लढण्याचं बळ देते
शुन्यातून विश्व उभारतांना ,
एक मजबूत कवच बनते ॥
चित्रात जसे रंग भरावेत,
जे आयुष्याला पुर्णत्व देतील ;
कवितेतील शेवटच्या कडव्या सारखे
आणि जीवनास अर्थपूर्ण शिर्षक मिळेल ॥
काळाच्या बदलत्या परिस्थितीत ही ,
ध्रुव ताऱ्यासारखा तू अढळ आहेस
श्वासात गुंफलेल्या श्वासा सारखा ,
नवचैतन्याने प्रबळ आहेस ॥
उन्हातली तू सावली ,
काळोखातला तू प्रकाश
यश शिखराला आच्छादणारे
तू मोकळे आकाश ॥
ऋतू असो कोणताही
तुझं अस्तित्व मनातला वसंत आहे
अंताची पाऊलवाट जरी असली ,
तुझ्या सोबत चालणे पसंत आहे ॥
शब्दांच्या पलीकडचे ,
तू आहेस पार्श्वसंगीत ;
केवळ तुझ्या असण्यानेच
जीवन बनले सुमधूर गीत ॥
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*तुझं असणं..*
मनाच्या कोपऱ्यात लपलात
कधी मला नाही उमगलात
संसार गाड्यात रमलात
तु गेल्यावर कळलं तुझं असणं….||१||
व्यवहार कसे शिकवलात
आर्थिक टंचाई न भासवलात
बचत शिकवून गेलात
तु गेल्यावर कळलं तुझं असणं….||२||
भित्रा स्वभाव बदलवलात
स्वबळावर उभं केलात
सावित्रीचे जोतीबा बनलात
तु गेल्यावर कळलं तुझं असणं….||३||
घरकुल स्वर्ग तयार केलात
तीन फुलं फुलवलात
अर्ध्यावर स्वर्ग सोडून गेलात
तू गेल्यावर कळलं तुझं असणं…||४||
आठवणीत फक्त उरलात
आत्मबळ देऊन तुम्ही गेलात
शब्द तुमचे रोज स्मरतात
तु गेल्यावर कळलं तुझं असणं….||५||
*रंजना राहूल ब्राह्मणकर*
*अर्जुनी/मो.जि.गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*
तुझं असणं मनाला
सखे मोहरून जाई
तुझं असणं जीवाला
सखे बिलगुण जाई
अलगद पडताच
तुझ्या प्रेमाची सावली
मखमली फुलापरी
माझ्या नयनी भरली
एक स्वप्न डोळ्यातलं
तुझ्या संगे जगतांना
हळुवार मनातलं
सर्वकाही बोलतांना
क्षणोक्षणी छेडतो हा
तुझ्या भासांचा गजर
माझ्या शब्दांना फुटतो
नवा प्रेमाचा बहर
तुझं असणं म्हणजे
खऱ्या सुखाची चाहूल
माझ्या या कवितेतलं
तूच सुगंधीत फूल
*कुशल गो डरंगे अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*
तुला पाहताच मी जातो हरवून
तुझ्यामुळेच फुले जीवनी चैतन्य
तुझं असणं चंद्र नभीचा प्रकाश
रवि किरणांचे चैतन्य झकास
तो वारा अल्लड येतो सुसाट
वादळातही मी असतो तटस्थ
तुझ्या मध्ये गुंतला श्वास
तुझ्या शब्दात सुगंध सुवास
तुझ्याविना आकाश रिक्त भासे
तुझ्याच मुळे चैतन्य प्रकाशे
क्षणो क्षणी तुझी आठवण यावी
स्वप्नात भेट तुझी नित्य व्हावी
तुझे माझे नाते जन्मांतरीचे
नाते फुलावे बंधरेशमाचे
अंतर्मनात प्रेम कोरून जावे
तुझ्यासाठी ह्रदयी हसून घ्यावे
*श्री.पुरुषोत्तम ठोंबरे*
*झिंगाबाई टाकळी, नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*
तुझं असणं…
तुझं हसणं…
डोळ्याला तू दिसणं..
एवढंच तर होत मागणं…
तुझं नितांत प्रेम करणं..
डोक्यावरून मायेचा हात फिरवणं..
आम्ही त्या प्रेमात सुखावणं..
एवढंच तर होत मागणं….
चांगल्या वाईटाची जाण देणं..
चुकांना पोटात घालणं…
कधी वरवर कठोर होणं…
एवढंच तर होत मागणं….
तुझं घरात असणं..
भिंतींचही श्वास घेणं…
बागेचही खुलून फुलणं…
एवढंच तर होत मागणं….
आई…आता तू नाहीस..
वाटत,संपलं सारं जगणं..
ना कोणास आई म्हणणं..
ना उरल आता काही मागणं…
ना उरल आता काही मागणं…!
*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©सदस्या -मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*
तुझं असणं होतं गं
महत्वाचं खूप आई
तुझ्याविना नाही गं
जीवनात हुरूप आई …!!
तुझ्या कुशीत होती
ऊब मायेची गं किती
नव्हती वाटत कधीच
मला संकटाची भीती..!!
डोक्यावरून हाताचा
फिरणारा स्पर्श खास
तुझ्याविना वाटतो गं
सणोत्सव पण उदास..!!
तुझं असणं होतं मला
वटवृक्षासम गं आधार
तुझ्या आशिर्वादामुळे
वादळही व्हायचे पसार ..!!
तुझं असणं होतं आई
माझं सारं जग आनंदी
उरलाय विरहवेदनांचा
समुद्र या काळजामधी..!!
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*
होतं अस्तित्व माझं
जीवनात तुझं असणं
बनवून घेतलं होतं
तुझं जीवन माझं जगणं
नव्हतीच तुला कल्पना
की किंमतच वाटली नाही
स्वतः पुढे माझ्या भावनांची
उणिवच भासली नाही
होता द्वेष दुर्गुणांचा
तुझा कधीच नव्हता
राक्षसी तुझ्या वागण्याचा
मनात त्रागा होता
आजही स्वतः साठी जगतोस
मी मात्र आता शांत आहे
वादळ पेलले खूप
आता हार मानली आहे
वाटायचे ते वाटून घे
समजायचे ते समजून घे
मी माझ्याशी प्रामाणिक
तुला हवे तसे जगून घे
मी आता निशब्द आहे
भावनांचा कोरडा दगड
गेले आयुष्य निघून सारे
कशाची न आता आवड
स्वतः ला जोपर्यंत समजत नाही
तोपर्यंत व्यर्थ सारे प्रयत्न
दे कशीही वागणूक
असेल कदाचित सापत्न
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*सहप्रशासक मुख्यपरीक्षक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*
साऱ्या दुःखाचा एकच उपाय,
मनमोकळे असणं हसणं…
आल्या संकटावर मात करा,
उगाच देत बसू नयेत दूषणं…१
नांदती समाधानी प्राणीजीव,
होती जेव्हा तुझी कृपादृष्टी…
करी संसाराचे संगोपन तू,
करून स्नेहाची प्रेम वृष्टी…२
नाही कुणा उणीव भासू दिली,
नाही कमी केलीत हवा पाणी…
भरभरून देत गेली ओंजळी,
ऐसी विश्वात दुजा नाही दाणी…३
निसर्ग देती सुख आणि शांती,
प्रेमळतेत……..जगणं बसणं…
‘सुधाकरा’ देही नवजीवनास,
हवे सृष्टी असंच तुझं असणं…४
*सुधाकर भगवानजी भुरके*
*आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*
अवचित हे स्वप्न जागलं
त्या स्पर्शात मी मिटले
काय घडले काही कळेना
रंगात तुझ्या मी रंगले
भूमीवरी पाऊल पडेना
मना लागले रे पिसे
भाववेड्या या मनाला
आता आवरु मी कसे
तुझं असणं माझं जगणं
तुझ्या कवेतची आभाळ
तुझ्या पदावरी श्रीहरी
टेकू दे मजसी रे भाळ
गात्रांत चैतन्य चेतलं
क्षण क्षण उत्सव झाला
तोची गंध कस्तुरीचा
अंगभरी मी लपेटला
फुलाफुलांत फुलूनिया
मीच आता फूल जाहले
तुझ्या अस्तित्वाच्या खुणा
जळीस्थळी शोधू लागले
निळे आभाळ पांघरूनी
ओढाळ स्पर्श शोधते
लाजताना मी आता
नभी चांदणी ही लाजते
निळ्या सावळ्याचं गारुड
माझ्या अंगभरी पसरले
मीच सावळ्याच्या आता
शिरी मोरपीस शोभले
मना लागे निळी चाहूल
अंगांग मम मोहरले
अंतर्यामी तू झिरपता
मीच कान्हा रे जाहले
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



