Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्ररायगड

जे. एस. एम. महाविद्यालयात ‘कॅम्पस कनेक्ट ड्रग्स मुक्त रायगड’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 9 0 2 7

जे. एस. एम. महाविद्यालयात ‘कॅम्पस कनेक्ट ड्रग्स मुक्त रायगड’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज मिडीया

अलिबाग, (दि १३) : जे. एस. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रायगड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कॅम्पस कनेक्ट – ड्रग्स मुक्त रायगड’ या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युवकांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीबाबत जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यावेळी अलिबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रविण पांडे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. डॉ. गौतम पाटील यांनी शुभेच्छा संदेश देत व्यसनमुक्त समाजनिर्मितीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख व्यख्याते पोलीस निरीक्षक श्री. प्रविण पांडे यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे सेवन, त्याचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम तसेच व्यसनामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांबाबत मार्गदर्शन केले. युवकांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहून आपल्या उज्ज्वल भवितव्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, तसेच समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन डॉ. पंकज घरत यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 0 2 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे