0
4
8
2
9
3
कस्तुरी
साऱ्या सुगंधात श्रेष्ठ
म्हणे कस्तुरी सुगंध
त्याच्या सानिध्यात नाही
तुम्हा सापडे दुर्गंध
सौंदर्य प्रसाधने असो
की धार्मिक पूजाअर्चा
प्राचीन काळापासून
वापराची होते चर्चा
देण्या कस्तुरी सुगंध
करी प्राणांचाही त्याग
त्याच्या समर्पणाची रे
ठेवा मानवांनो जागं
कस्तुरीचा दरवळ
सांजवेळची सावली
गाभाऱ्यात ओसंडती
जणू भक्तीचीच बोली
बाह्य जगी शोधताना
जन विसरे अंतरी
तू ग आत्म्याची ओळख
नव्हे केवळ कस्तुरी
दिनकर झाडे
गडचांदूर जि.चंद्रपूर
0
4
8
2
9
3



