अभ्यास माझा विषय गणित
अभ्यास माझा विषय गणित
प्रश्न १ ला :- दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना घटक n(S) काय असेल ?
१) 4✅
२) 2
३) 6
४) 8
प्रश्न २ रा :- दोन नाणी एकाच वेळी फेकली जर C ही घटना एकच छापा मिळण्याची असेल तर C या घटनेतील नमुना घटक म्हणजेच n(S) काढा.
१) 2✅
२) 3
३) 4
४) 1
प्रश्न ३ रा :- एक समतोल फासा फेकला जर B ही घटना वरच्या पृष्ठभागावर विषम अंक येणारी असेल तर n(B) = ?
१) 1
२) 2
३) 3✅
४) 6
प्रश्न ४ था :- दोन फासे एकाच वेळी फेकले जर A ही घटना वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज ही पूर्ण वर्ग संख्या येते असे दर्शवित असेल तर A मधील नमुना घटकांची संख्या म्हणजेच n(A) काढा ?
१) 2
२) 7✅
३) 6
४) 3
प्रश्न ५ वा : – तीन मुले व तीन मुली यांच्यामधून दोन विध्यार्थ्यांची खालील घटनेप्रमाणे पर्यावरण समिती बनवायची आहे. A ही घटना : समितीत दोन्ही मुली असाव्यात तर A या घटनेतील नमुना घटकांची संख्या काढा.
१ ) 1
२ ) 3✅
३ ) 2
४ ) 6
प्रश्न ६ वा : – एक नाणे फेकले असता छापा मिळण्याची संभाव्यता किती ?
१ ) 0
२ ) 1
३ ) 1/2✅
४ ) 2
प्रश्न ७ वा :- तीन नाणी एकदाच फेकली असता कमीत कमी दोन छापा मिळण्याची संभाव्यता काढा ?
१ ) 1
२ ) 1/2✅
३ ) 1/4
४ ) 3/8
प्रश्न ८ वा : – एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मिळालेली संख्या 5 पेक्षा लहान असण्याची संभाव्यता काढा ?
१ ) 1/2
२ ) 2/3✅
३ ) 1/3
४ ) 5/8
प्रश्न ९ वा : – दोन फासे एकाच वेळी टाकले असता त्यांच्या वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 13 असण्याची संभाव्यता किती ?
१ ) 1/2
२ ) 1/6
३ ) 1/4
४ ) 0✅
प्रश्न १० वा :- योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छीक पद्धतीने काढला तर तो पत्ता लाल असण्याची संभाव्यता काढा ?
१) 1/4
२) 1
३) 1/2✅
४) 1/3
श्री. अशोक गंगाधर लांडगे
ता. नेवासा जि.अहमदनगर
============



