“महाराष्ट्रात आयुष मंत्रालय तसेच विद्यापीठ स्थापन होणे गरजेचे”; डॉ.मनीषा कोठेकर,
निमा वुमेन्स फोरम तर्फे 'जागतिक महिला दिन' संपन्न

“महाराष्ट्रात आयुष मंत्रालय तसेच विद्यापीठ स्थापन होणे गरजेचे”; डॉ.मनीषा कोठेकर
निमा वुमेन्स फोरम तर्फे ‘जागतिक महिला दिन’ संपन्न
राष्ट्रीय भारतीय औषध प्रणाली आयोग अध्यक्षा डॉ.मनीषा कोठेकर यांचा सत्कार तथा संवादात्मक सत्राचे यशस्वीपणे आयोजन
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: (दि १६ मार्च) ‘भारतीय चिकित्सा पद्धतीचा उत्कर्ष साधण्यासाठी महाराष्ट्रात आयुष मंत्रालय तसेच विद्यापीठ स्थापन होणे गरजेचे आहे’ असे प्रतिपादन डॉ.मनीषा कोठेकर, अध्यक्षा, राष्ट्रीय भारतीय औषध प्रणाली आयोग (एनसीआयएसएम) यांनी निमा वुमेन्स फोरम, नागपूर शाखा द्वारा ‘जागतिक महिला दिन’ निमित्ताने स्थानिक केडीके इंजिनिअरिंग कॉलेज सभागृह, नंदनवन, नागपूर येथे आयोजित निरंतर प्रशिक्षण संवाद सत्रप्रसंगी केले.
अध्यक्षस्थानी निमा केंद्रीय सल्लागार डॉ. रविंद्र बोथरा हे होते. सर्वप्रथम आरोग्य देवता भगवान धन्वंतरी / विद्यादेवता मां सरस्वती प्रतिमा- पूजन- मालार्पण-स्तवना मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने निरंतर प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन करण्यात आले. नागपूरातील जेष्ठ रक्तविज्ञानतज्ञ (हिमॅटालॉजिस्ट) डॉ. अवतारकृष्ण गंजू यांनी ‘मॅनेजमेंट ऑफ आयरन डिफिशियन्सी ऍनिमिया इन डे-टुडे प्रॅक्टिस’ या विषयावर उपस्थित निमा चिकित्सकांना बहुमोल मार्गदर्शन केले. तदनंतर निमा वुमेन्स फोरम सोबतच विविध आयुर्वेद महाविद्यालय/वैद्यकीय संस्था द्वारा ‘निमा’ नागपूर च्या सदस्या असलेल्या एनसीआयएम च्या अध्यक्षा डॉ. मनीषा कोठेकर यांचा शाल, श्रीफळ, गुलाबगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.मनीषा कोठेकर यांनी भारतीय चिकित्सकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत उपस्थितांशी सुसंवाद साधून, आयुर्वेद स्नातकांच्या अधिकारांचे हनन होणार नाही, याबद्दल आश्वस्त केले. सोबतच वैद्यकीय क्षेत्रात उकृष्ठ कामगिरी करणाऱ्या डॉ. शीतल आसुदकर / गुज्जनवार, डॉ. प्रवीण सहावे, डॉ. मिलिंद सूर्यवंशी या निमा सदस्यांचा सन्मान करण्यात आला. निमा वुमेन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ. विणा फाये यांनी स्वागतपर प्रास्ताविक, डॉ. शीतल येंडे व डॉ.अर्चना जुमळे यांनी कार्य संचालन तर डॉ. वैशाली चरडे, कोषाध्यक्ष यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाला केंद्रीय निमाचे डॉ. शैलेंद्र अग्रवाल, डॉ. मृण्मयी मासोदकर, राज्य निमाचे डॉ. मीनाक्षी सराटकर, डॉ. राहुल राऊत, डॉ. शांतीदास लुंगे, आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. मोहन येंडे, डॉ. मधुसूदन गुप्ता, डॉ. वीरेंद्र शहा, डॉ. सुभाष वाघे, डॉ. गौतम जोगड, डॉ. ममता रेवतकर, डॉ. वैशाली कुर्वे, डॉ.अशोक उरकुडे, डॉ. अरुण फरकसे, डॉ. सुरेश खंडेलवाल, डॉ. जीवेश पंचभाई, डॉ. मंगेश भलमे, डॉ. दिलीप फाये, डॉ. विणा पंचभाई, डॉ. भावना भलमे, डॉ. संध्या वाघ, डॉ. शुभांगी बिजवे, डॉ. शेखर तनमने, डॉ. राजू कोसे, डॉ. अनिमेश भोयर, डॉ. मुमताज आलम, डॉ. अर्पिता चाफले यांचेसह वैद्यकीय चिकित्सक/विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



