0
4
8
2
9
7
संविधान दिन
नागरिकांना मिळाले हक्क
26ता.भारतीय संविधानाने
सोनियाचाच दिन आजचा
‘बाबा’मुळे लाभले वरदानाने
संविधान आहे देशाचा प्राण
आम्हाला मिळाला देशात मान
संविधान आहे देशाची जान
देशात केला मोठा सन्मान
आम्ही भारताचे लोक
लोकशाही जपावी निरपेक्ष
भारताचे संविधान असे
सार्वभौम समाजवादी साक्ष
स्वातंत्र्य, समता, बंधुता
प्रतिष्ठा राष्ट्र एकात्मता
ज्ञान, बुद्धी, सामर्थ्यता
संधी, दर्जा अभिव्यक्तता
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी
अनेक सत्याग्रह धोरण स्वीकारले
अधिकार मतदान हक्क,जाती
भेदभाव विरोध हे घटनेत मांडले.
अर्चना राजू ईंकने
आरमोरी,जि.गडचिरोली
0
4
8
2
9
7



