Breaking
क्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

“सुमन कल्याणपूर यांचे स्वरमयी जीवन संगीतप्रेमींना प्रेरणादायी; डाॅ.मधुसूदन घाणेकर”

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 6 1 3 9 9

“सुमन कल्याणपूर यांचे स्वरमयी जीवन संगीतप्रेमींना प्रेरणादायी; डाॅ.मधुसूदन घाणेकर”

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे : (दि 14 सप्टेंबर 2026): “ख्यातनाम गायिका सुमन कल्याणपूर यांचा आवाज प्रासादिक, सोज्वळ होता. त्यांनी सहा दशकाहून अधिक काळ संगीत सेवेसाठी समर्पित केला. त्यांचे स्वरमयी जीवन हे संगीतप्रेमींना प्रेरणादायी असे आहे. ” या शब्दात आंतरराष्ट्रीय कीर्तिचे गायक, शीळवादक आणि संगीत अभ्यासक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी स्व.सुमन कल्याणपूर यांच्या पवित्र स्मृतीस नम्र अभिवादन केले.

डाॅ.घाणेकर यांनी स्व.सुमन कल्याणपूर यांची काही गाणी शीळवादनाद्वारे सादर केली. मधुस्वर इंटरनॅशनल संस्थेतर्फे सुप्रसिद्ध गायिका डाॅ.गीतांजली जेधे , आशा कामे, लता म्हात्रे , मनीषा सराफ आणि शलाका गाडगीळ यांना सुमन कल्याणपूर स्मृती पुरस्कार डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. तसेच सुप्रसिध्द हस-या निवेदिका, सूत्रसंचालक मधुकर्णिका सासवडे यांना मधुस्वर इंटरनॅशनल तबस्सुम स्मृती गौरव पुरस्कारही डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

तबस्सुम यांच्या निवेदनांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमात सतत फुलं उमलत राहिली, असे डाॅ.घाणेकर यांनी तबस्सुम यांच्या ‘फुल खिले गुलशन गुलशन ‘या कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले. आत्तापर्यंत एक हजाराहून अधिक मान्यवर गायक गायिकांचा सन्मान .डाॅ मधुसूदन घाणेकर यांनी केला आहे.

स्वागत, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन मधुस्वर इंटरनॅशनल संस्थेच्या निमंत्रक ॲड. संध्या देशपांडे यांनी केले. पुरस्कारार्थी गायिकांनी ना तुम हमे जानो , रहे ना रहे हम, झिमझिमती श्रावण धारा, रे क्षणांच्या संगतीने , दिलने फिर याद किया आदि गाणी सादर करुन स्व.सुमन कल्याणपूर यांना आदरांजली वाहिली.

या सोहळ्याचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी अनितकालिकाच्या 1183 व्या विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात , डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी गेल्या शतकावर प्रभाव टाकणा-या अजरामर हिंदी चित्रपट गीतांवर आधारीत विश्वविक्रमी ‘यादे ‘ या एकपात्री कार्यक्रमाचा 27,000 वा प्रयोग सादर केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 1 3 9 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे