Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनमुंबई

जे. एस. एम. कॅम्पस मध्ये स्व-संरक्षण कार्यशाळा संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

जे. एस. एम. कॅम्पस मध्ये स्व-संरक्षण कार्यशाळा संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: जे. एस. एम. महाविद्यालय महिला कक्ष व अंतर्गत समिती तसेच अ‍ॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ८ मार्च २०२५ रोजी महिला स्व-संरक्षण कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रशिक्षक म्हणून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी मा. अमिषा भगत उपस्थित होत्या.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अ‍ॅड. गौतम पाटील व उपाध्यक्ष मा. डाॅ. साक्षी पाटील यांनी महिला दिनानिमित्त सर्व महिला प्राध्यापक व विद्यार्थीनीना शुभेच्छा दिल्या. जे. एस. एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या तसेच गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी स्वयंसिद्ध व आत्मनिर्भर बनणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. प्रशिक्षक मा. अमिषा भगत यांनी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावयाचे असल्यास महिलांसोबतच पुरुषांचेही प्रबोधन करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थीनीना विविध प्रकारच्या सोप्या युक्त्या वापरून अडचणीच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे सोदाहरण प्रात्यक्षिक देण्यात आले. या प्रसंगी अ‍ॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या अ‍ॅड. नीलम हजारे तसेच विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीप्रमुख प्रा. वर्षा पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच उपस्थितांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे