माजी विद्यार्थी सत्कार व स्नेहमिलन सोहळा मालेवाडा येथे संपन्न
रजत डेकाटे प्रतिनिधी भिवापूर/मालेवाडा
माजी विद्यार्थी सत्कार व स्नेहमिलन सोहळा मालेवाडा येथे संपन्न
माजी विद्यार्थी यांनी व्यक्त केले आपले मनोगत
रजत डेकाटे प्रतिनिधी
भिवापूर/मालेवाडा
नागपूर/ मालेवाडा: (दि २७ जानेवारी): भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे शासकीय सेवा आणि सामाजिक सेवा देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व स्नेहमिलन सोहळा नुकताच आनंदात संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून या सोहळ्याला सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष स्वातीताई सहारे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मालेवाडा येथील ग्रामपंचायतच्या सरपंच राखी इंगोले होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती विस्तार अधिकारी भिवापूर ऋग्वेद भांडारकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिति या सोहळ्याला लाभली होती. माजी विद्यार्थ्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या माध्यमातून स्वागत केले.
खरे पाहता या विज्ञान युगात म्हणजेच मोबाईल युगात खरी आणि सत्य मित्रत्वाची स्नेहांची भेट फार कमी झालेली आहे. कारण मोबाईल ने जग जवळ केले पण संवाद आणि भेटी या खरच दूर झाल्या आहे. त्यामुळे आपल्या जुन्या शाळेतील जुन्या आठवणी नव्याने उजळून निघाव्यात याकरिता अविस्मरणात गेलेल्या जुन्या माजी विद्यार्थ्यांची अचानक भेट झाल्यावर सर्वांनाच भरभरून आनंद झाला. काही वेळ त्यांनी गावातील दवाखान्यात त्यांच्यात मनमोकळ्या गप्पा रंगल्या. माजी विद्यार्थ्यांनी डिजीटल वर्ग खोलीची पाहणी केली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अनेकांचे मने भरून आली.
शाळेच्या माध्यमातून डॉ. नामदेव इंगोले,डॉ. अरुण इंगोले, बाबुराव आंभोरे, पुरुषोत्तम इंगोले, रामचंद्र डाखोरे, श्रावण शेंडे, रवींद्र इंगोले, रमेश शेंडे, विजय इंगोले, गणेश इंगोले, रामदास राऊत, नारायण इंगोले, बाळू इंगोले,सुरेश तिडके, रंजना गेडाम या शासकीय सेवा आणि सामाजिक सेवा देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवा आणि सामाजिक सेवा देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुरजलाल येल्ले यांनी केले तर त्यांनी कवितेच्या माध्यमातून शाळेतील विखुरलेली पाखरं पुन्हा येतील का भेटायला गेलेले दिवस येईल का पुन्हा सजवायला असे असे आपल्या प्रास्ताविकेतून व्यासपीठावरील माजी विद्यार्थ्यांची त्यांनी मने जिंकली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिक्षिका माधुरी इमाने यांनी केले तर आभार शिक्षिका वर्षा चापले यांनी मानले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गावातील नागरिक व नवतरूणांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.



