Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील नागपूर

0 1 9 6 9 7

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*☄विषय : चोरून भेटताना☄*
*🍂शनिवार : ०४/ जानेवारी /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*चोरून भेटताना*

तुला चोरून भेटताना
दाटते अनामिक हूरहूर
वाटते उगाच मनाला
कुणी नाही ना दूर दूर… //

लपतछपत येतोय मी
अनेक नजरा टाळत
शंका वाटते कुणीतरी
असेल ठेवून पाळत.. //

भिती पेक्षा ओढ मोठी
मी येतोय धावत पळत
जणू चुंबकीय शक्तीने
खेचतो कळत नकळत.. //

रोखता येईना कदापी
हे आकर्षण असे भारी
उभी राहो दंड थोपटून
विरोधात दुनिया सारी.. //

या प्रेमासाठी वाट्टेल ते
तुजसाठी मन वेडे पिसे
भेटीपोटी तहान भूक
काळ वेळेचे भान नसे… //

आडवळणी भेटीगाठी
कातरवेळ तिन्हीसांजा
किती घ्यावी काळजी
नको गावात गाजावाजा.. //

किती काळ चुकवावा
तू सांग जगाचा पहारा
कधी घेईन मी राजरोस
तुझा ओंजळीत चेहरा.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰💕🔰♾️♾️♾️♾️
*चोरून भेटताना*

नजरा चोरून लोकांच्या
आपण चोरून भेटतांना
किती ओढ असायची
दोघांनाही भेट घडतांना

वाटे मनोमनी तू नसावा
मज पासून क्षणभरही दूर
भेटायला आला नाहीस तर
विरहात आसवांना येई पूर

कधी शहर कधी बसमध्ये
प्रिया तू मी चोरून भेटतांना
तो प्रवासही सुखकर वाटे
गोड गप्पात रंगून जातांना

सहवास घडता सख्या तुझा
हृदयी प्रित फुलून आली
कळलेच नाही वेड्या मना
रेशीम बंध कधी जुळली

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰💕🔰♾️♾️♾️♾️
*चोरून भेटताना*

चोरून भेटताना सखे
नको बाळगू भिती
आखून घेऊ आपण
आपल्या प्रेमाच्या मिती

भेट व्हायचीच आहे
तर भिती कशाला
प्रेम निष्कलंक आहे
का कोरड घशाला

तू माझी नि मी तुझा
इतुकेच पुरे आहे
प्रेम आपले प्रिये
निर्विवाद खरे आहे

भेट होईल पुन्हा एकदा
गुजगोष्टी करू काही
निर्मळ प्रेमाला जगी
कोणतीच उपमा नाही

जग बोलेल काही
होतील चर्चा कितीदा
प्रेमाच्या वाटेवर या
संकटे येतील बहुदा

म्हणून भेट टाळणे
हे फारसे बरे नाही
भेटीत जुळतील मने
सहवासाची हीच ग्वाही

भेटून जा एकदा तू
होईल प्रेमाचे बोलणे
हातात हात दोघांचा
साक्ष आकाशीचे चांदणे

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*ता.जुन्नर जि.पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰💕🔰♾️♾️♾️♾️
*चोरून भेटताना*

तुज चोरून भेटताना
मनी हुरहूर दाटली
परी ओढ तव भेटीची
अंतरात आसावली

कसे सांगू मी तुला रे
मन अधिर अधिर
रुंजी घालतो मनात
तुझा चांदण-अबीर

नभांतरी या दूर दूर
घनावली दाटल्या
मनात भाव कल्पना
रंग लेवूनी या सजल्या

तुझ्या स्पर्शाचा आठव
मनी उठले रे काहूर
रातराणी गंधाळलेली
पैंजणात नवाच नूर

सहवास तुझा हवासा
क्षण उत्सवची व्हावा
बकुळीचा गंध असा
तुलाच लेवूनी यावा

पौर्णिमा चांदणलेली
हात तुझा हातात
प्रतिबिंब तुझेच रे
माझिया नयनात

चांदणल्या रात्रीसही
आज सुचती उखाणे
सख्या तुझ्या भेटीसाठी
मन जाहले दिवाणे

चमकती चांदण्या नभी
की माझिया मनात
घेई कवेत जरासे
जीव होऊ दे रे शांत

उधळल्या तारका
चांदवाही थांबला
रात अधीर जाहली
पाहण्या तुला मला

तुझ्या मिठीत गवसले
सौख्य हे युगायुगांचे
दरवळात तव प्रीतीच्या
तेवले दीप पंचप्राणांचे

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰💕🔰♾️♾️♾️♾️
*चोरून भेटताना*

चोरून भेटताना तुला
व्हायची छाती धडधड
मन होई घाबरेघुबरे
मध्येच होई पडझड

नजर राही चोहीकडे
बघतय का मला कुणी?
धुंदी तुला भेटण्याची
बहाणा भरायचे पाणी

लक्ष तुझ्या माझ्यावर
ठेवती गावकरी जन
हुलकावणी देण्यात
होतो पटाईत आपण

तुला चोरून भेटण्याची
ओढ असायची आगळी
समोर कुणी दिसताच
बसायची मग दातखिळी

होते तुझ्या माझ्यात
शुद्धभाव आकर्षण
आठवता ते दिवस
वाटते मनी प्रसन्न

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰💕🔰♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*चोरून भेटतांना*

स्त्री मनाचा हा खेळ
करडी नजर प्रेमाची
धुंद येतो दाटून मनी
चोरून. भेटण्याची

आईबाबांच्या चोरू नजरा
करत असते प्रेमला मुजरा
तारूण्यमय वय तयांचा
बंधनच नसतो वयाचा

चोरून भेटतांना कुणला
थोडा समजतो मनाला
अंधारात टिपतात नजरा
दाबून ठेवतात प्रकाशाला

तारूमय हा जिवनच
सार काढतो जिवनाचा
भावनांना फुटतो पेय
नसतो भय नितीमत्तेचा

चुकवून नजरा ईतरांच्या
मजा घेतात चोरून भेटतांना
लक्षच नसतो कुणाकडे
लाज वाटतो हे बघतांना

जीवनचा आनंद सुखात
चोरून भेटण्याचा आनंद प्रेमात
दोष नसतो त्या वयाचा
काय कुणाला म्हणायचा ?

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔰💕🔰♾️♾️♾️♾️
*चोरून भेटताना*

मन हेलावून गेले,
दाटलेले भाव तुझ्या,
कुशीत ओथंबून गेले,
हळुच अंकुर फुटले,
त्या मायेच्या ममतेला,
चोरून भेटताना……

काय दाटुन ठेवले होते,
ते त्या ह्दय पेटीत बंद,
नाही समजले त्यातले,
तुझे डोळ्यातले भाव,
तोंडातल्या हलविता,
बोल तुझे चोरून,
भेटताना…..,…

काळजात ओढून घेतले,
निष्ठुर त्या लेकरासाठी,
बंद पापण्यांची उघडझाप,
कंप तुझे ओढवून घेतले,
आशेच्या हिंदोळ्यावर मन,
झोके घेताना दिसले नाही,
तुला चोरुन भेटताना…..

आईविना जगातील ही किर्ती,
कुठे शोधू तुला मी झालो गं,
एकटाच राहीलेला पिंजऱ्यातला,
श्वास कुठे सोडून गेला आई,
सुने सुने आभाळ कुठे शोधू तुला,
मोकळा श्वास कुठे शोधू तुला,
आईविना जग हे अधुरी,
तुला चोरुन भेटताना…,.

मन हे फाकले उंच उंच झुला,
त्या मायेच्या कुशीत डोके,
स्वप्नांच्या दुनियेत जगताना,
वास ना राहिला सुगंधी फुले,
मोबाईल फोन होता तुला,
चोरून भेटताना आवाजाची,
ना सापडले नाही आई……

जीवन हे अनमोल धन हृदयाशी,
जोडताना सुई धाग्याची वीण,
कशी शिवू तोडुन टाकले,
आम्हा लेकरांना आई,
मोह मायेच्या पसारा टाकुनी,
गेली या दुनियेला सोडुनी,
तुला चोरून भेटताना……

*सौ.नंदा नथ्थुजी कामडी चंद्रपूर*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔰💕🔰♾️♾️♾️♾️
*चोरून भेटतांना*

दोस्तांनी घेरलं
चोरून भेटतांना,
आईने पाहीलं
मुलांना जातांना ॥१॥

विटीदांडू खेळून
आला दमुन-भागुन
भरला बोकाणा
चिवड्याचा छान ॥२॥

हळुच आईने
लाडू केला समोर
बघितलं प्रेमाने
हात ठेवला डोईवर ॥३॥

उर आलं भरून
गणूला आईची माया
दिली लाडवान
आणि ममतेची छाया ॥४॥

मन लावून केला,
गणूने अभ्यास
आला वर्गात पहिला
झाला उत्तम पास ॥५॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰💕🔰♾️♾️♾️♾️
*चोरून भेटतांना*

तू काही ऐकायचा नाही
मी कितीही म्हटले काही
मी कितीही टाळले तरी
तू भेटल्याशिवाय रहायचा नाही

नाही जरी दिसले तरी
घरासमोरून तुझी चक्कर
आशा तुझी फार मोठी
होईल चुकून नजरेत टक्कर

कितीही पाडून बोला
तुला लागले नाही
सवयच झाली होती
माझीच होई त्राही

काय होते आकर्षण
उमजले न मला
नाही म्हणायचा कंटाळा
आला होता मला

आता विचार करते
मला तेव्हा जाणिव नसेल
मी समजलेच नाही
तुला काय वाटत असेल

चोरून भेटतांना पाहते
आज चौफेर प्रेमींना
नाही थांबवू शकत
तुझ्या मग आठवणींना

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰💕🔰♾️♾️♾️♾️
*चोरून भेटतांना*

तुला चोरून भेटतांना
भीती मनात दाटली
पण ओढ भेटण्याची
श्वासांनाही पाउले फुटली

ते जुने ओळखीचे झाड
ज्यावर कोरलेले नाव
ती खूण आपल्या प्रेमाची
आहे ना सख्या ठाव

तुला यायला झाला उशीर
घट्ट बिलगले झाडाला
वाढले ठोके ह्रदयाचे
नकळत आले रडायला

दात विचकत आठवणी
क्षणात समोर आल्या
प्रीतीच्या दवाने मनाच्या फांद्या
पुन्हा पल्लवित झाल्या

तुझ्या येण्याची चाहूल
पाकळी ही झाली सुगंधी
सावरले कसेतरी स्वतःला
शांत झाली संशयाची आँधी

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰💕🔰♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 6 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे