
0
5
1
6
4
1
दिवाळीचं फूल
तीन चार महिन्यापासून
सोनेरी सपन मनात कोरलं
आवंदा पाहिल्यानंच झेंडूच बी पेरलं
रोप तयार करायसाठी
रात दीस मेहनत केली
पाणी ,खत दवा
वाटल ती दिली
घरादारावर पाणी सारं सोडलं
म्हणून राजेही..शिवार सारं बहरलं…
तोडणी करून झेंडूची
दुकान बाजारात मांडलं
घेवाल नसल्यानं
डोळ्यात पाणी मात्र कोंडलं…
चिल्लर घेईना कोणी म्हणून बेपारी गाठला
तो म्हणे साजरा बकरा कटला…
बळीराजाच्या कष्टावर डल्ला त्यानं मारला
बळीराजा मात्र सणासुदीत झुरला…
झेंडूचं फुल माह्या कोणाच्या देव्हाऱ्यात
कोणाच्या दारावर, कोणाच्या तिजोरीवर वाहलं..
बळीराज्याचं सपन मात्र डोळ्यादेखत इरलं…
सोमकांत साखरे (सिद्धेश्वर)
ता. चिखली, जि. बुलढाणा
0
5
1
6
4
1



