शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट अकरा🌈🌈🌈*
*☄विषय : कैफियत*☄
*🍂शनिवार : ०१ / मार्च /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*कैफियत*
*सुखाचे सोबती सारे*
*दुःखात कुणाची ना साथ*
*ऐकणारंच नसेल कुणी*
*का मांडू कैफियत व्यर्थ*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*कैफियत*
कैफियत आपल्या जीवनाची
का सांगावी कुणाला
तेच लोक आपल्या मागे
मीठ चोळतात जखमेला
*सुनंदा किरसान*
*अर्जुनी मोर गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*कैफियत*
स्त्री जातीची कैफियत मांडू कशी
रोज एक नव्याने इथे महिला पडते फशी
खरडून काढू वाटते चांबडी शरीराची
केस तोडूनी व्यथा सांगे बलात्काराची
*सौ. सुरेखा रा.चित्ते*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कैफियत*
कशी मांडू कुणापुढे
माझी कैफियत
वय जेव्हा वैरी बणते
कुणी नसते ऐकत
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*कैफियत*
कैफियत भोवताली साऱ्यांचीच
अस्तित्व धोक्यात लेकी-बाईंचीच
संपून गेलीय का माणूसकी-संवेदना?
खरचं जिवंत आहोत का या वर्तमाना?
*सौ.हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*कैफियत*
कैफियत कुणाला
सांगून काय फायदा
दगडाच्या काळजाला
कळेना दु: ख कदा
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*कैफियत*
कैफियत बाळकृष्णाची
मांडू चला यशोदेकडे
गवळणींच्या घड्यावर
लपून मारतसे खडे.
*प्रवीण हरकारे*
*ता.नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*कैफियत*
आधार स्तंभ ढासळला
तुटला आशा मनोरा
जीवनाची कैफियत सांगता
कुणी ना देई मायेचा दुजोरा
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*चारोळी-कैफियत*
कैफियत शब्दात मांडावी कशी
रोजच विटंबणा स्त्री देहाची
जिच्या उदरी जन्म तुझा माणसा
टांगतोस वेशीवर लफ्तरे तिच्याच अब्रूची.
*सौ. इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या ,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*कैफियत*
कैफियत माझी कुणापुढे
मी कधीच मांडली नाही
अनुभवले प्रसंग जीवनी
कुणापुढे अश्रु ढाळले नाही
*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*कैफियत*
टेबलावरच्या पुस्तकाने
कैफियत आज अशी मांडली
वाऱ्यासोबत पाने फडफडवूनी
स्वतःची दुःखे जणु सांडली
*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



