0
4
8
2
8
6
मौन
नजरेची भाषा कधी कळते
आपुलकीची जिथे जागा असते
वेदनांची सुई उगाच का टोचते
ह्रदयातील अश्रूंना वाहण्यास जागा नसते
शब्द कुठे कुठे का होतात मुके
कधी कधी डोळ्यातही दाटते धुके
पदरापलीकडचे अश्रू ढळतात मुक्त
होतात मनीच्या भावना नजरेसमोर लुप्त
हास्य तनुवर वरवरचे प्रकटते
मनातील जखमांचे नासूर बनते
का आकळावा अर्थ भावनांचा
उमजावा कसा भाव मौनाचा
उदास रिकामे भासले जरी
कुठे थांबते हे आयुष्य तरी
सौख्य कुठे आहे असे मनास जोडलेले
कटाक्षात एका कुठे मन ताडलेले
कुठे शोधावा मनीचा सहारा
कोणाच्या मौनातील भावनिक ओलावा
शर्मिला देशमुख-घुमरे
जिल्हा बीड
===========
0
4
8
2
8
6



