जे. एस. एम. महाविद्यालयामध्ये NAAC New Metrics – 2024 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
जे. एस. एम. महाविद्यालयामध्ये NAAC New Metrics – 2024 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: जे. एस. एम. महाविद्यालयाच्या IQAC विभागामार्फत शुक्रवार दिनांक 04/04/2025 रोजी महाविद्यालयाच्या कै. जयवंत केळुस्कर सभागृहामध्ये NAAC New Metrics – 2024 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कार्यशाळेचे बीजभाषक मा. डॉ. पीयुष पहाडे, अध्यक्ष IQAC क्लस्टर, अॅड दत्ता पाटील काॅलेज आॅफ लाॅ च्या प्र. प्राचार्या अॅड निलम हजारे, डाॅ. प्रीती फाटे, IQAC कॉर्डिनेटर जे. एस. एम. महाविद्यालय अलिबाग हे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. प्रीती फाटे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक सादर केले. प्रा. कपिल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यशाळेचे आयोजन दोन सत्रात करण्यात आले होते. ज्यामध्ये बीजभाषक डॉ. पीयुष पहाडे यांनी प्रथम सत्रामध्ये के. राधाकृष्णन कमिटी रिपोर्ट आणि NAAC साठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच द्वितीय सत्रात NAAC New Metrics – 2024 नुसार 10 Attributes बद्दल सक्रिय परस्पर संवादातून मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेमध्ये रायगड, रत्नागिरी व नवी मुंबई येथील एकूण 115 प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेची सांगता प्रा. जयेश म्हात्रे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
सदर कार्यशाळेच्या आयोजनासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले.



