0
4
8
3
0
0
विद्रोह
निर्भीड आणि स्पष्ट मतवादी
अन्यायाविरुद्ध शब्दांची धार
सोशिकतेची एकटीच गुत्तेदार
मनात विद्रोह उसळला फार…
घायाळ स्वप्नांचे तुकडे तुकडे
लक्ष्मणरेषेत कशी सांधणार?
पंखच कापून टाकल्यावर मग
पोटासाठी रोज काय रांधणार…
दडपणाच्या ओझ्याने जडले
बी पी शुगर खंडीभर आजार
काळजातल्या दुःख वेदनांचा
एक्स रे कुठेच नाही निघणार…
नको दुष्ट स्वार्थी नियमावली
श्वासावर ना हक्क कुणाचा
का बरं हिरावता विनाकारण
हक्क स्वातंत्र्यात जगण्याचा…
विद्रोह संहारक ज्वालामुखी
होईल क्षणातच राखरांगोळी
बैल गेला नि झोपा केला नको
खावी सामंजस्याने पुरणपोळी…
राजश्री मिसाळ ढाकणे
ता.जि.बीड
============
0
4
8
3
0
0



