
0
6
5
6
0
4
यशाची व्याख्या
अपयश शिकवितो आम्हाला
ठेवा जिद्द चिकाटी हिंमत
जरी अपयश आले पदरात
घाबरू नये केव्हाच जीवनात
अपयशच असतो यशाची पायरी
शिकायला मिळतो नव नवीन
त्यांना कार्यान्वित करीत राहून
मिळतो एक नव जीवन
लहानापासून होतो मोठा
नवनवे येतात अनुभवात
करायला मिळतात अभिनव
सहनशीलता असावी अंगात
आत्मबल, महत्वाकांक्षा हेच
वाढवतात आपली प्राथमिकता
विवेक बुद्धीला मिळतो चालना
वाढत असते आपली प्राथमिकता
गुण कौशल्याने माणूस
पोहचतो यशाच्या शिखरावर
हळूहळू होऊन विकास
राहतो सुखाच्या सावलीत जीवनभर
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
0
6
5
6
0
4



