Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूर

श्रीमद् भागवत कथा व्यसन मुक्ती सप्ताह सोहळा 15 मार्चपासून

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 1 6 5 2

श्रीमद् भागवत कथा व्यसन मुक्ती सप्ताह सोहळा 15 मार्चपासून

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर / बेसा : (दि १३) दत्तधाम नगर बेसा पिपळा नागपूर येथे प्यारेलाल राधेश्यामजी धारगे व समस्त धारगे परिवार यांच्या सौजन्याने दि. 15 ते 22 मार्च या दरम्यान, श्रीमद्भ भागवत कथा व्यसन मुक्ती सप्ताह सोहळा आयोजित केलेला आहे.

याप्रसंगी राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून उपस्थिती राहतील. आणि प्रमुख पाहुणे व उद्घाटक सौ. कीर्तीताई धनराजजी बडोले नगराध्यक्ष बेसा पिपळा यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. कर्मयोगी संत थोर व्यसनमुक्तीचे सम्राट मधुकरराव खोडे उपाख्य (खराटे महाराज) ईसापूर ता. दिग्रस जि.यवतमाळ येथील व्यसन मुक्ती सम्राट मधुकरराव खोडे उपाख्य खराटे महाराज यांच्या पावन उपस्थितीत नागपूर शहरात अनेक प्रकारे व्यसनमुक्तीवर कार्यक्रम झाले आहे.

ग्रामसफाई करणे, झोळीमध्ये व्यसनांची भिक्षा मागणे, आणि दात्यांचे पाय धुणे हाच त्यांचा उद्देश आहे. म्हणूनच दहा वर्षानंतर खोडे महाराजांचं नागपूर शहरात आगमन होत आहे. भागवत कथेचा प्रारंभ रविवारी 15 मार्चपासून तर 21 मार्च पर्यंत दुपारी 2 ते 6 यावेळेत होणार आहे. 21 मार्चपर्यंत भागवत कथेचे आयोजन आणि रविवारी 22 मार्च रोजी हभप मधुकरराव खोडे (खराटे महाराज) यांचे काल्याचे कीर्तन सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत होईल. त्यानंतर दुपारी 2:30 वाजतापासून महाप्रसादाला सुरुवात होईल. कृपया समस्त नागरिकांनी व भक्तांनी या भागवत कथेचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे