
0
4
0
9
0
3
मनाचा दिवा
मनात काही असेल तर
बोलून टाकायचं असतं,
वितुष्ट असेल मनात तर
काढून टाकायचं असतं.
जगून घेऊया मनसोक्त,
करूया थोडी मौजमस्ती;
न वाटावी शेवटच्या क्षणी
का केली इतकी सुस्ती.
पन्नाशीनंतर मूल बनून
बालपण जगायचं असतं,
प्रौढं बनून पाप–पुण्याचं
गणित मांडायचं नसतं.
“मी मोठा” म्हटल्यानं
कुणीच मोठं होत नाही;
कार्यानं माणूस मोठा होतो,
तर चापलुसकीन नाही.
सांगतो कुणी काहीही,
कुणाच बिघडत नसतं;
विचार करावा फक्त
आपलं तर चुकत नसतं.
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
0
4
0
9
0
3





