
0
4
0
9
0
3
खुल्लमखुल्ला
मेंदूभ्रष्ट झाला जणुकाय
खुल्लमखुल्ला बोलतात
स्वतः च्या विचार दृष्टीने
उगीच चुकीचे तोलतात…!!
हो ला हो म्हणतात सारे
बुद्धी टाकून गहाण अशी
सत्य असत्य पारखताना
विवेकबुद्धी नाही फारशी…!!
काड्या करण्यात कोणी
यांचा धरणार नाही हात
दुष्ट विचारचक्र सुरू राही
अहोरात्र यांच्या तनमनात…!!
टाकलेच नसेल जिभेवर
जन्मताच यांच्या झाकण
बिनपगारी करतात उगी
कशाला इतरांची राखण…!!
खुल्लमखुल्ला पेरलेले
वटवृक्ष रूपांतर होणार
एकेक फळ चाखताना
पळती भुई थोडी होणार…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
4
0
9
0
3





