0
4
8
2
9
3
पैशाचा बाजार
भ्रष्टाचार वाढला सर्वत्र
भरलाय पैशाचा बाजार
पैसा खाण्याचा एकच
जडला सर्वांना आजार…!!
प्रामाणिकता शब्द फक्त
शब्दकोशात नावापुरता
एवढे मोठे पद मिळूनही
पैसा मिळवी येताजाता…!!
नियम ठेवले गुंडाळून सारे
रातदिन खातो फक्त पैसा
स्वार्थाचा चष्मा डोळ्यावर
सत्य कधी दिसेल माणसा…!!
सख्खे भाऊच पक्के वैरी
रक्ताचा विसर तुला कसा
हळूहळू पैशाच्या मोहात
जसा जाळ्यातील मासा…!!
पैशाचा बाजार सगळीकडे
सर्व शोधती फुकटचा पैसा
पाप पुण्याचा हिशोब अंती
सांग कसा देशील माणसा…??
राजश्री मिसाळ ढाकणे
बीड
0
4
8
2
9
3



