0
4
8
2
9
3
चाहूल थंडीची
लागताच चाहूल थंडीची
वाटे हवासा स्पर्श उबदार
झोंबता वारा सय चहाची
शेकोट्या पेटती दारोदार
रंगती गप्पा चावट रे भारी
कानं टवकारी लालसेपोटी
सांगा सांगी रे करती सारी
प्रश्नच नसे रे खरं की खोटी
गावभर होई गुपीत सारे
डंका वाजता थोबाड वासे
रडण्याचं रे नाही कारण
विश्वासार्थ काय ठेवी तारण
चाहूल थंडीची काटे रे अंगी
उबदार कपडे स्वागत जंगी
स्वेटर,रजई,मफलर नि टोपी
काठी आपटत येई बहुरूपी
ऊन , पाऊस लागतो आसरा
बोचरी थंडी लावूया कासरा ?
दसरा झाला संक्रांत येईल
हृदयीचा गोडवा वाढत जाईल
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
0
4
8
2
9
3



