ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध
समर सत्तेचा नारा
गोवर्धन तेलंग पांढरकवडा, जि.यवतमाळ

0
5
9
7
0
2
समर सत्तेचा नारा
बंधुभाव मानवता,वाहो भारतात वारा!
गाऊ समरसत्तेचा नारा, नारा जयभीम नारा!!
बोला जयभीम.
हिन्दू मुस्लिम शिख ईसाई बौद्ध सारे!
सूर्य चंद्र आपलेच, निळ्या नभाचे तारे!!
प्रकाशित दाही दिशा अन् सागर किनारा!!१!!
विसरुन धर्म पंथ, तिरंगा हाती धरावा!
मिसळून आनंदाने,मानव धर्म जपावा!!
समाजात हेवेदावे, उरणार नाही थारा!!२!!
राग व्देष सोडून देऊ,जपू प्रेम भावना!
मस्जिद अन् मंदिरात, करू मंगल प्रार्थना!!
प्रगती उध्दारासाठी, संविधान स्विकारा!!३!!
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा, जि.यवतमाळ
==========
0
5
9
7
0
2



