Breaking
क्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबई

“जय जय शनिदेव” या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा उत्साही प्रतिसाद

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

“जय जय शनिदेव” या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा उत्साही प्रतिसाद

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे: सध्या प्रेक्षकांच्या प्रतिसादा अभावी काही मालिका बंद करायची वेळ वाहिन्यांवर आली असतानाच दुसरीकडे नवनविन मालिका धुमधडाक्यात सुरू होत आहेत आणि या नव्या मालिकांना प्रेक्षकांचा उत्साही प्रतिसाद मिळतो आहे. त्याच रांगेत ‘जय जय शनिदेव’ नावाची धार्मिक मालिका नुकतीच वाजत गाजत दाखल झाली.

या मालिकेत सूर्यपुत्र शनिदेवांची महागाथा उलगडत जाणार आहे. धर्म शास्त्रात शनिचा उल्लेख सूर्याप्रमाणेच एक ग्रह म्हणून करण्यात आलेला आहे. या ग्रहाचे ब्रह्मांडातील स्थान, त्याचे आगळे वेगळे रूप, गडद निळा रंग आणि त्याभोवतीचं रहस्यमय कडं याबद्दल खगोल शास्त्रज्ञांनाही खूप कुतूहल आहे. याचा खगोल शास्त्रीय अभ्यास सखोलपणे एकीकडे सुरू असताना या ग्रहाभोवती गुंफलेलेल्या रहस्यमय कथा, दंत कथा, त्याच्या उग्र स्वरूपाभोवती असलेले गूढतेतचे वलय याची आकर्षक मांडणी आपल्या शिवपुराण इत्यादी धार्मिक ग्रंथातून जी केलेली आहे.

त्यात शनिला न्यायाची देवता असे म्हटले आहे. शनि हा न्याय देवता असूनही “शनि मागे लागला” असे म्हणून सर्वसामान्य लोकांमध्ये शनिबद्दल मनात एक प्रकारची भीती रूतून बसलेली आढळते. प्रत्यक्षात या नकारात्मक चित्रापेक्षा शनिदेवांचे चरित्र पुराणांमध्ये वेगळ्या पध्दतीने ग्रथीत केले गेले आहे. भक्तांच्या जीवनात सुख, शांतता आणि समाधान मिळवून देण्या-या तसेच, प्रयत्नवादाची शिकवण देणा-या शनिदेवांच्या या गुण वैशिष्ट्यावर मालिकेत प्रकाश टाकला जाणार आहे.

यानिमित्त फारसे प्रचलीत नसलेले आगळे वेगळे रूप या मालिकेत विविध कथांच्या माध्यमातून मनोरंजकपणे प्रेक्षकांसमोर येणार आहे. “संकेत खेडकर” हा तरूण गुणी अभिनेता शनिदेवाची भूमिका साकारत असून त्याने या भूमिकेसाठी मेहनतीने अभ्यास करून भरपूर तयारी केली आहे.

मालिका विश्वात धार्मिक मालिकांचे एक अढळ स्थान आहे. सुंदर दागदागिने, उंची वस्त्रअलंकार आणि भव्य सेटस तसेच व्ही एफ एक्स ईफेक्ट यांनी सजलेल्या अशा मालिकांचा एक खास चाहता प्रेक्षकवर्ग आहे. “येल्लकोटी” या निर्मिती संस्थेमार्फत सादर होत असलेल्या या मालिकेचे लेखन धार्मिक पौराणिक मालिका लिहीण्यात हातखंडा असलेले प्रसिध्द लेखक संतोष आयाचित यांनी केले आहे.

शनि महात्म्यामध्ये सर्वात महत्वाची व्यक्तीरेखा “राजा विक्रमादित्य” ही कपिल होनराव या अभिनेत्याने साकारली असून राणी पद्मसेनेच्या भूमिकेत अंकीता लोंढे ही अभिनेत्री आहे.त्रिशूल मराठे महादेव आणि रूही तारू देवी पार्वतीची भूमिकेत, तर पुण्याची गुणी नाट्यअभिनेत्री अनुश्री दुर्वे विक्रमादित्याच्या आईच्या भावपूर्ण भूमिकेत आपल्या अभिनयाचे रंग भरत आहे. प्रसन्न केतकर, शरद गुरव, रेखा सागवेकर, कुणाल गाभारे, अक्षय पाटील ईत्यादी जुने-नवे कलाकार वेगवेगळ्या भूमिकेत झळकले आहेत.

कुटुंबात आबालवृध्दांनी एकत्र बसून पाहता येईल, अशी ही मालिका प्रेक्षकांवर किती जादू करतेय याची उत्सुकता आहे. जय जय शनिदेव’ सोमवार ते शुक्रवार रोज रात्री 9.30 वाजता सोनी मराठीवरून प्रसारीत होते आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे