0
1
8
3
2
2
आयडिया
बसल्या बसल्या आजोबा घेत होते झोप
मागेपुढे होतेय डोकं, काही तरी करावा खटाटोप
काय करावे, काय करावे,शोधु लागली नजर
आयडिया आली डोक्यात,वाजवावा जोरात गजर
गजर वाजला घनघन,तर आई करेल भनभन
आयडियाचे तुकडे तुकडे, नजरेपुढे छनभन
काय करावे काय करावे,टेबलाला शेंडी बांधूया
हिसका लागताच केसांना, इथनं पळून जाऊया
शेंडी दोरीला बांधताना,केस गेले कानात
गुदगुल्या होऊन उठले आजोबा,कोण आहे करत जोरात
आपलं काही खरं नाही, आता नको थांबायला
बेक्कार आयडिया सुचली, विनाकारण मार खाल्ला.
संगिता रामटेके/भोवते
साकोली भंडारा
0
1
8
3
2
2