0
1
8
3
9
4
लोकशाही
वास्तव पाहून कालचे
हळहळली लोकशाही
पैसे घेऊन लोक काल
बोटाला लावत होते शाही
अनमोल आपले किंमती मत
लोक विकत होते काही
मी तुझ्या जातीचाच भाऊ
नेता त्यांना देत होता ग्वाही
अनमोल मताची किंमत
लोकांना कळेंना केल्या काही
हक्क मिळवून देण्या भिमाने
संसाराची परवा केली नाही
परिवर्तनाचा रथ रोखण्या
धर्मवेढे यशस्वी झाले काही
खरंच आज वाटते लाज
पैशापुढे हरली लोकशाही
संविधानाची शपथ घेणारा
एकही नेता निर्मळ नाही
कायद्याचे नियम नित्य
पायदळी तुडवत आहे तोही
हवे ते करून घेण्यासाठी
होते घटनादुरुस्तीची घाई
संविधानच्या गाभाऱ्यात आता
खरच गाभा उरला नाही
ज्यांचे रक्षण केले घटनेने
आज बेईमान झाला तोही
वास्तव पाहून विदारक हे
आज हळहळली लोकशाही
विनाशाकडे वाटचाल ही
धोक्याची घंटा ठाई ठाई
चोर पावलाने हळूहळू
देशात येत आहे हुकूमशाही
प्रकाश पुंडलिक गोधने
ता. कंधार .जि नांदेड
0
1
8
3
9
4