कर्जत तालुक्यातील खांडपे आदिवासी वाडीवर गरीब गरजूंना कपडे वाटप
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील खांडपे आदिवासी वाडीवर गरीब गरजूंना कपडे वाटप
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
रायगड: (दि २१): अलिबाग तालुक्यातील आवास गावातील सामाजिक कार्यकर्ते देवदत्त जोगळेकर सर हे गेली अकरा वर्षे अनेकांकडून जुने कपडे व रोख रक्कम गोळा करून ते सर्वोदय ग्राम परिवर्तन मंडळ, नंदनपाडा – खालापूर या संस्थेमार्फत आदिवासी वाडी, वस्तीवरील गरीब गरजूंना वाटप करतात.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंगळवार दि. २१ जानेवारी २०२५ रोजी देवदत्त जोगळेकर सर यांच्या पुढाकाराने गोळा केलेले कपडे आवास येथून ग्रुप ग्रामपंचायत – आवास माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीत राणे यांनी दिलेल्या टेम्पोतून कर्जत तालुक्यातील खांडपे या गावातील आदिवासी वस्तीवर नेऊन तेथील गरीब गरजू लोकांना वाटप करण्यात आले व जमा झालेली रक्कम सर्वोदय ग्राम परिवर्तन मंडळाचे कार्यवाह प्रमोद पाटील यांच्या कडे सुपुर्द करण्यात आली.
गोळा केलेले कपडे आवास येथून कर्जत तालुक्यातील खांडपे या आदिवासी वाडीवर नेऊन तेथील गरजू लोकांना वाटप करण्यासाठी देवदत्त जोगळेकर सर यांना सर्वोदय ग्राम परिवर्तन मंडाळाचे कार्यवाह प्रमोद पाटील [ नंदन पाडा ], अनंत भिडे [ अलिबाग ], अनघा भिडे [ अलिबाग ], अक्षय गोळे [ अलिबाग ], समिर कवळे [ थळ ], राजेंद्र सुंकले [ थळ ], प्रविण पाटील [ वायशेत ], केशव चांदोरकर सर [ बहिरोळे ] व धनंजय भगत [ आवास ] यांनी सहकार्य केले. कपडे वाटप झाल्यानंतर सर्वांनी खांडपे गावातील बाळाराम देशमुख यांच्या घरी स्नेहभोजन केले.



