Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकिय

कबड्डी प्रशिक्षक संदेश दत्तात्रेय वर्तक ‘कुलाबा जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 4

कबड्डी प्रशिक्षक संदेश दत्तात्रेय वर्तक ‘कुलाबा जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग( दि ५ जाने ) तालुक्यातील आवास गावचे रहिवासी संदेश दत्तात्रेय वर्तक यांनी दिलखुश क्रीडा मंडळ, आवास या कबड्डी संघामधून अनेक वर्षे स्वतः कबड्डी खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. अनेक वर्षे राष्ट्रीय पंच म्हणून ते कार्यरत असून अनेक मोठ्या कबड्डी स्पर्धांमध्ये पंच म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

दिलखुश क्रीडा मंडळ, आवासच्या महिला कबड्डी संघाचे प्रशिक्षक म्हणून आजवर त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे व मेहनतीमुळे दिलखुश क्रीडा मंडळ, आवासच्या महिला कबड्डी संघाने आजवर बारा वेळा रायगड जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये १२ वेळा अंतिम विजेतेपद पटकावले असून यामध्ये सलग ८ वेळा अंतिम विजेतेपद पटकावले आहे. दिलखुश क्रीडा मंडळ, आवासच्या महिला कबड्डी संघातील अनेक आजी – माजी कबड्डी खेळाडू महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत आहेत.

श्री स. म. वडके विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,चोंढी – किहीमच्या विद्यार्थ्यांना ते गेली अनेक वर्षे कोणतेही मानधन न घेता कबड्डीचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ते विद्यार्थी जिल्हास्तर व विभागस्तरापर्यत यश संपादन करत आहेत. संदेश दत्तात्रेय वर्तक यांची कबड्डी पंढरीतील निष्ठावंत वारकरी म्हणून सर्वत्र ओळख आहे. त्याचप्रमाणे समाजकार्यातही त्यांचा आजवर फार मोठा सक्रीय सहभाग राहिला आहे.

शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी आद्य शिक्षिका, कवियत्री सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट – रायगड, भाई जगताप मित्र मंडळ – रायगड आणि अॕड. मा. श्री. उमेश ठासकूर मित्र मंडळ – रायगड, यांच्या संयुक्त विद्यमाने सातिर्जे, अलिबाग-रायगड येथे मुंबई काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष आमदार भाई जगताप, शेतकरी कामगार पक्ष सरचिटणिस, माजी आमदार जयंत पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य शंकर म्हात्रे, श्रीवर्धन नगर परिषद नगराध्यक्ष अतुल चौगुले, अलिबाग नगर परिषद माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रशांत नाईक, नगरसेविका मानसी म्हात्रे, नगर सेवक समीर ठाकूर, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य रविंद्र ठाकूर, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्या रविना ठाकूर, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान कायम सदस्य प्रविण ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सुनिल थळे, काँग्रेस सेवा फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष अॕड. उमेश ठाकूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संदेश दत्तात्रेय वर्तक यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार – २०२६ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

त्याबद्दल संदेश दत्तात्रेय वर्तक यांचे अलिबाग तालुका पंचायत समिती माजी सदस्य रणजीत प्रभाकर राणे, ग्रुप ग्रामपंचायत आवासच्या सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीत प्रभाकर राणे, उपसरपंच राजेंद्र वाकडे, सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आवास ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. तसेच समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे