Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजननागपूरभंडारासाहित्यगंध

गटसाधन केंद्र पवनी येथे ‘मराठी भाषा दिन’ उत्साहात संपन्न

संपादक:राहुल पाटील

0 5 1 7 8 1

गटसाधन केंद्र पवनी येथे ‘मराठी भाषा दिन’ उत्साहात संपन्न

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात शिक्षण विभागातर्फे गटसाधन केंद्र , पंचायत समिती, पवनीच्या वतीने नगर परिषद लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयात ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी संजयकुमार वासनिक उपस्थित होते. गट समन्वयक डॉ मुरलीधर रेहपाडे यांच्या आयोजनाखाली प्रत्येक केंद्रातून दोन शिक्षक याप्रमाणे शिक्षकवृंद काव्यप्रेमी वर्ग उपस्थित होता.

याप्रसंगी आयोजित कवी संमेलनाचे डॉ. मुरलीधर रेहपाडे यांनी संमेलनाध्यक्षपद भूषविले. प्रत्येकांनी कविता व कथाकथनाचे सादरीकरण केले. जि.प.उच्च प्रा. शा. भोजापूर येथील शिक्षक साहित्यिक पाटील आर. जी. यांनी ग्रामीण कथेवर भाष्य करणारं ‘नाम्या वारीक’ कथाकथन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

याप्रसंगी एस.झेड. बावनगडे, एस.पी.खडके, श्रीमती तुळसकर, भोजराज पडोळे, मंजूषा दलाल, दिपाली बोरीकर, अशोक गिरी, एन.जी.हरकल, स्वाती भोसले, एन.पी. अहिरराव, सुकेसनी खोब्रागडे, एस.डी.ढेंगे, पी.ए. ब्राम्हणकर, सीमा भंडारे, सोनू कुंभरे इत्यादी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 8 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे