नवा साल,नवा बहर’; संग्राम कुमठेकर
‘नवा साल,नवा बहर’; संग्राम कुमठेकर
“बहर”या रचनेची सर्वोत्कृष्ट मध्ये निवड केल्याबद्दल मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक मा. राहुल दादा पाटील तसेच सचिव पल्लवीताई पाटील, प्रशासक सविताताई पाटील, मुख्य परीक्षक वैशालीताई अँड्रसकर, तसेच सर्व परीक्षक व सहप्रशासक मंडळींचे मनःपूर्वक आभार मानतो.
२०२५ हे वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही मनःपूर्वक शुभेच्छा. मग नुकतीच मकरसंक्रात आपण साजरी केली. तिळगुळ घ्या गोड गोड बोला… फक्त असं म्हणून चालणार नाही.. तर सर्वांनी मराठीचे शिलेदार परिवाराचा जिव्हाळ्यातील गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण कोण,कुठले परंतु राहुल दादांच्या मार्गदर्शनाखाली व्यासपीठावर आपण एकत्र आलो आहोत.कविता,चारोळी, हायकू,बालकाव्य, चित्र चारोळी, त्रिवेणी इत्यादी काव्यप्रकार आपण हाताळत असताना एकमेकांच्या रचनेला दाद देतो. यातून जो ऋणानुबंध निर्माण झाला आहे याचे सर्वस्वी श्रेय मुख्य प्रशासक राहुल दादांना जाते. त्यांच्या प्रेरणेतून अनेक कवी कवयित्री उदयास आले. हे मी स्वतः पाहिलेले आहे. सात-आठ वर्षापासून अहोरात्र एकच ध्यास उराशी बाळगून राहुल दादा व त्यांची टीम परिश्रम घेत आहेत. त्याचाच परिणाम अनेकांच्या जीवनामध्ये बहर आलेला आहे.
मागील काही दिवसापासून कादंबरीचे लेखन करण्याच्या विचारात असताना काव्यलेखनाकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. सतत डोक्यात कादंबरीचा विचार चालू असल्यामुळे काव्याकडे कधीतरी पाहण्यात येत होते. काल “बहर”विषय पाहिला नी माझ्यासारखाच अनेकांच्या जीवनातील बहर संपलेला आहे असेच मला वाटू लागले. याचे कारण म्हणजे सध्याची राजकीय उदासिनता… प्रसिद्धीच्या हव्यासापायी मृगजळासम वाटणाऱ्या अनेक घोषणा राजकारणी करतात. पूर्ण भारताचा विचार केल्यावर एक प्रगत भारत आणि एक दरिद्री भारत असेच चित्र पहावयास मिळते. काही मध्यमवर्गीय लोक आपल्याच विश्वात गुंग झालेले आहेत. आपलं काय जातंय म्हणून स्वतःच्या सुखासाठीच फक्त धावत आहेत.समाजामध्ये अनेक प्रश्न भयंकर धारण करत असताना ते सोडवायचे सोडून नको त्या गोष्टीवर शासन स्तरावर वारेमाप पैसा खर्च केला जातो. एकीकडे विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शाळा बंद करण्याचा प्रकार सुरू आहे आणि सरकारी तिजोरीत पैसा नसल्यामुळे विकासाच्या अनेक योजनांना कात्री लावून बंद पाडल्या जात आहेत. धार्मिकतेच्या नावाखाली ज्यातून सर्वसामान्य जनतेचा कसलाही फायदा होणार नाही अशा गोष्टीवर पैसा उधळला जात आहे. अशी विदारक परिस्थिती असताना मनाला काल्पनिक बहर कसा येईल ? हीच सत्य परिस्थिती मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि ती रचना परिक्षकांना आवडली. मला सन्मानित केल्याबद्दल एकदा सर्वांचे हार्दिक आभार मानतो.
श्री.संग्राम कुमठेकर
मु.पो.कुमठा (बु.)
ता.अहमदपूर जि.लातूर
सहप्रशासक/परीक्षक/संकलक
©️मराठीचे शिलेदार समूह



