Breaking
कवितामराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

भावनाशून्य

मायादेवी गायकवाड मानवत, जि.परभणी

0 4 8 2 8 6

भावनाशून्य

जगी सर्वं सुखी,असा कोणी
शोधूनहीं,सापडणार नाही,
दुःखाला कवटाळून बसून
तुम्ही स्वतःला,गमवायचे नाही.

प्रसंग येतात,बरे वाईट
जीवन उद्धवस्त होण्याचे,
आत्मभान ठेवून मात करावी
हित होईल तुमच्या आयुष्याचे.

चेहरा करू नये भावनाशून्य
हसू होईल,निर्वीकार वागण्याने,
आले,कितींही बिकट संकट
मात करावी, धिरोदत्त विचाराने.

चढावेच,लागतात प्रत्येकाला
वळणावळणाचे चढउतार,
तरच कळते,किंमत जीवनाची
खचून करू,नये कधी पायउतार.

दुःख असावेच,प्रत्येकाला
त्याशिवाय जगणे,निरस होईल,
परंतु त्याला कवटाळून बसून
जगण्यातला आनंद गमावू नये.

मायादेवी गायकवाड
मानवत, जि.परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे