Breaking
ई-पेपरकविताबीडमराठवाडासाहित्यगंध

गुरुशिष्य व्हॅलेंटाईन

राजश्री मिसाळ ढाकणे ता. जिल्हा बीड

0 4 8 2 8 4

गुरुशिष्य व्हॅलेंटाईन

घडवीतो गुरु शिष्यशिल्प
घालून नयनी ज्ञान अंजन
गुरुपौर्णिमा शिक्षकदिनी
Rose day ने गुरुपूजन…!!१!!

गुरु शिष्य नाते सर्वश्रेष्ठ
न मागता मिळे सर्वकाही
वेगळा Propose day
जीवनात असणार नाही…!!२!!

गुरु असो वा शिष्य कोणी
बुके वा पुष्पहाराने सन्मान
खराखुरा Chocolate day
शुभेच्छा आशीर्वादाचे दान…!!३!!

चिमुकल्या शिष्यामध्ये गुंग
रोज नवेनवे खेळतात खेळ
हाच असतो Teddy Day
मिळतो नित्य आनंद निर्भेळ…!!४!!

आईवडील गुरुआज्ञा पालन
तंतोतंत आचरण सर्व ते ते
यापेक्षा कोणता असेल बरं?
विश्वातील Promise day…!!५!!

शाळेच्या प्रांगणात सकाळी
गुरुभोवती शिष्यांचाच वेढा
आवर्जून बघा Hug Day?
आनंददायी गोलाकार केवढा!!६!!

गुरुजीला विद्यार्थी एकसमान
कुरवाळून थाप देती शाबास
वात्सल्यामूर्ती गुरुजींची रजा
वाटतो Miss Day शिष्यास..!!७!!

वर्षातून एकदाच विश्वामध्ये
Valentine Week साजरा
ज्ञान सुसंस्कार ज्ञानमंदिरात
देशस्तंभ नित्य घडतो गोजिरा…!!८!!

गुरुशिष्य व्हॅलेंटाईन नित्य
नाते दोघांमध्ये जगावेगळे
प्रेम माया भविष्य काळजी
रक्ताचे नातेही फिके सगळे…!!९!!

राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे