
0
4
0
8
9
0
पेरणी
पाऊस पडला । पेरणी आरंभ
शेतकरी दंग । कामामध्ये ॥१
शेताच्या दिशेने । चाले बैलगाडी
लागे ऊंच झाडी । रस्त्यामध्ये ॥२
सर्जा नि राजाची । जोडी कामदार
कधीही तयार । कामासाठी ॥३
सारा बारदाणा । चाड नळ्या मोघे
निघाले ते दोघे । पेरणीला ॥४
रिमझिम पडे । सरीवर सरी
लक्ष ढगावरी । पेरतांना ॥५
क्षणाची उसंत । नसे ल्या कामात
अंधारली रात । होत असे ॥६
हायसे वाटते । पूर्ण कार्य होई
दिर्घ श्वास घेई । आनंदाने ॥७
दीपककुमार सरदार
तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
==========
0
4
0
8
9
0





