Breaking
ई-पेपरकवितामराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

काळीमा माणूसकीला

विष्णू संकपाळ बजाजनगर

0 4 8 2 9 0

काळीमा माणूसकीला

मानव होतोय दानव

ना उरे सीमा विकृतीला

राजरोसपणे फासतोय

काळीमा माणूसकीला… //

 

कसे म्हणावे बुद्धीजिवी

निर्घृणतेचा केला कळस

लोप पावले माणूसपण

पशूंनांही वाटेल किळस.. //

 

सारासार विवेक संयम

सांग कुठे गहाण पडला

वासनांधता जागी झाली

अन् अक्षम्य गुन्हा घडला.. //

 

तुझ्या क्रौर्याच्या निषेधार्थ

मेणबत्त्या जाळल्या खूप

मात्र अजून परस्रीत तुला

दिसेना मातृ भगिणी रूप… //

संधी मिळताच जमवतो

तू लिंगपिसाट गोतावळा

लांडग्यासारखे तुटून पडता

हरणीचा घोटण्यास गळा… //

यात नारी जाते जीवानिशी

तिच्या अब्रूचा होवून कचरा

तारीख पे तारीख न्यायासाठी

मायबापाच्या कोर्टात चकरा… //

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
===================

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे