Breaking
ई-पेपरकविताकृषीवार्ताबीडसाहित्यगंध

ऋतू हिरवा

राजश्री मिसाळ ढाकणे ता. जिल्हा बीड

0 5 9 0 3 4

ऋतू हिरवा

डोंगराच्या कुशीत दाटली
बघा कशी हिरवी पहाट
पानापानांत झुळूक गाते
धरतीचा दिसतो थाटमाट…!!

थेंबांच्या मोत्यांनी सजली
मातीची काया ओलसर
हिरव्या रंगी न्हाऊन सृष्टी
नववधूपरि दिसते सुंदर..!!

झाडांच्या पानांतून झिरपे
सूर्यकिरणांची सोनेरी धार
हिरव्या ऋतूच्या पदराखाली
नटला जणूकाय सारा संसार..!!

शेतामधली इवली रोपे
दाखवी स्वप्नांची पालवी
कष्टकरी जगाचा पोशिंदा
डोळ्यांत दिसे आशा नवी…!!

हिरवा ऋतूआहेआशेचा
करूया वृक्षसंवर्धन सारे
पर्यावरण संतुलन राखणे
सर्वश्रेष्ठ महान कार्य खरे…!!

राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 0 3 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे