
0
4
0
9
0
3
आषाढ सरी
गर्दी दाटली नभात
नृत्य मयुराचे वनी
बरसे आषाढ सरी
शालू हिरवाच रानी
पायी प्रवास दिंडीचा
हाती टाळ नि मृदंग
मुखी गजर हरीनामे
भजनी वारकरी दंग
उन वारा नि पाऊस
नसे फिकीर तयांना
ओढ चंद्रभागातिरी
गती येई पावलांना
मृग बरसला अवघा
आषाढ सरींनी तारले
तल्लीन हा भक्तगण
अवघे रिंगण धरीले
घेऊन भगवी पताका
भेट सावळ्या विठ्ठला
जगी ठेव आबादाणी
चरणी वाहू पुष्पमाला
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जि नांदेड
=========
0
4
0
9
0
3





