Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणमहाराष्ट्र

भाईसाहेब पाशिलकर अमर रहे!

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 4

भाईसाहेब पाशिलकर अमर रहे!

आपल्या निवासस्थानी काल घेतला अखेरचा श्वास

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण व बांधकाम समितीचे माजी सभापती व रोहे तालुक्यातील सौजन्यमूर्ती आणि सर्वांचे आवडते “भाई” अर्थात भाईसाहेब पाशिलकर यांनी आपल्या निवासस्थानी काल (दि. १४फेब्रुवारी) अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधीस शेकडो चाहते उपस्थित होते.

भाईसाहेबांचा व माझा जुना परिचय ते सा. ” कुलाबा वैभव” चे जुने वाचक. भाई जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तसेच शिक्षण समितीचे सभापती असताना त्यांच्या अलिबाग येथील जि. प. च्या दालनात अनेक विषयांवर आम्ही चर्चा केलेली आहे . अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचा मी अध्यक्ष आहे . या संस्थेच्या ९ प्राथमिक शाळा आहेत . त्यापैकी भाल येथील उच्च प्राथमिक शाळेच्या एका कार्यक्रमासाठी भाईसाहेबांना मी निमंत्रित केले. जिल्हा शिक्षाणाधिकारी श्री बडे यांच्यासह त्या कार्यक्रमास उपस्थित राहिले . शिक्षणाधिकारी यांच्यासह सर्व वर्गाची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी हितगूजही केले.

हस्तलिखित प्रकाशानाच्या कार्यक्रमात जि. प. उपाध्यक्ष म्हणाले ” मी जिल्हा परिषदेचा शिक्षण समिती सभापति असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा पाहिल्या आहेत . पण वालेकर सरांच्या निमंत्रणानुसार खाजगी शाळा पहण्याचा योग आला. खाजगी संस्थेची शाळा असूनही विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती चांगली आहे” याबाबत संस्था चालक , मुख्याध्यापक व शिक्षकांना त्यांनी धन्यवाद . दिले. या कार्रक्रमात जि.प. शिक्षणाधिकारी बडे यांनीही शैक्षणिक प्रगतीबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक केले .

भाई आजारपणामुळे अनेक महिने बेडरेस्ट घेत होते . तरीही त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा व हितचिंतकांचा राबता सतत चालू होता . हीच लोकप्रियता होय. भाईसाहेबांच्या म्रुतात्म्यास चिरशांती लाभो हीच ईशचरणी प्रार्थना!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे