Breaking
आरोग्य व शिक्षणचंद्रपूरराजकियविदर्भ

विदर्भ तेली समाज महासंघ चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित

जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

0 4 8 2 9 4

विदर्भ तेली समाज महासंघ चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित

जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर: विदर्भ तेली समाज महासंघाचे विदर्भ अध्यक्ष मान. रघुनाथजी शेंडे व विदर्भ महासचिव डॉ. नांमदेवराव हटवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात बहुसंख्य प्रमाणात असलेल्या तेली समाजाच्या महासंघांच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रपूर येथील प्रतिष्ठित व सामाजिक कार्यकर्ते उप-प्राचार्य डॉ. संजय दौलतराव बेले यांची तर माजी अधिष्ठाता, माजी सिनेट सदस्य, प्रा. डॉ. नांमदेवराव भिवाजी वरभे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी एका पत्रकाद्वारे नुकतीच नियुक्ती केलेली आहे.

चंद्रपूर जिल्हाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ संजय बेले व कार्याध्यक्ष डॉ नामदेवराव वरभे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील समाजाच्या प्रतिष्ठित वरिष्ठ नेत्यांशी व मान्यवरांशी सविस्तर चर्चा करून नवीन जिल्हा कार्यकारिणी घोषित केली आहे. महासंघाच्या उपाध्यक्षपदी श्री विजयरावजी बावणे, डॉ. प्रभूदासजी चिलबुले, प्राचार्य कुनघडकर, श्री. हरिहरजी पोहाणे, श्री वसंतजी देशमुख, प्रा. पीतांबर पिसे, श्री अरूणजी लाखे, डॉ नंदाली झाडे, महासचिवपदी श्री कैलाश चलाख, सचिव पदावर श्री सतीश बावणे, श्री सोनल भरडकर, श्री विकास मोगरकर, श्री भुपेश लाखे, एड. आशीष पिसे, सहसचिव पदाकरिता एड. निनाद येरणे, डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. श्रावण बांनासुरे, एड. प्रशांत भडगरे, कोषाध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुभाष गिरडे, जिल्हा संघटक म्हणून मधुकरराव रागीट, श्री रवींद्र सांखरकर, श्री कवडूजी लोहकरे, श्री नरेंद्रजी इटनकर, श्री नारायनराव कोटकर, जिल्हा कार्यकररिणी सदस्य या पदावर भालचंद्र बोधनकर, बबन बांगडे, रमेश भांडेकर, प्रा. रवींद्र बुरांडे, एड. सौ. मनीषा बंडे, डॉ. भाग्यश्री रागीट, श्री. किशोर पिपरे, मार्गदर्शक सदस्य एड. वासुदेवराव खेळकर, श्री अनिल मोगरे, प्राचार्य डॉ. माधवराव वरभे, श्री प्रभाकर पिसे, यांची नियुक्ती केली आहे.

जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष म्हणून सौ. मिनाक्षिताई गुजरकर, चंद्रपूर तालुका व चंद्रपूर शहर महिला आघाडी अध्यक्षपदी सौ चंदाताई वैरागडे, जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष म्हणून श्री प्रतीक हरणे, चंद्रपूर शहर अध्यक्ष श्री अभय घटे यांची नियुक्ती केलेली आहे. जिल्ह्यातील चंद्रपूर तालुकाध्यक्ष म्हणून श्री किशोर राजेशवर बावणे, श्री राजेश सावरकर (मूल तालुकाध्यक्ष), श्री तुलक्षीदास कुनघडकर (सावली तालुकाध्यक्ष), डॉ. सतीश कावळे (सिंदेवाही तालुकाध्यक्ष), प्राचार्य श्री दिवाकर ठाकरे (नागभिड तालुकाध्यक्ष) डॉ रामेश्वर राखडे (ब्रम्हपुरी तालुकाध्यक्ष), श्री दर्शन बेले (बल्लारपूर तालुकाध्यक्ष), श्री पुरुषोत्तम गंधारे (राजुरा तालुकाध्यक्ष) श्री नितीन बावणे (कोरपना तालुकाअध्यक्ष). श्री. राजेश नेटाम (पोंभुर्णा तालुकाध्यक्ष), श्री. ऋषिजी धोडरे (गोंडपीपरी तालुकाध्यक्ष) प्रा. सुधीर मोते (भद्रावती तालुकाध्यक्ष), श्री. मधुसूदन टिपले (वरोरा तालुकाध्यक्ष), श्री ईश्वर डुकरे (चिमुर तालुकाध्यक्ष) सर्व तालुका अध्यक्ष हे जिल्हा कार्यकारिणीचे मानद सदस्य राहणार आहेत.

विदर्भ तेली समाज महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीत समाजातील डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, व्यावसायिक, महिला, युवा यासोबतच सर्वच घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विदर्भ तेली समाज महासंघाचे विदर्भ अध्यक्ष मान. रघुनाथजी शेंडे व विदर्भ महासचिव डॉ. नांमदेवराव हटवार आमदार अभिजीत वंजारी, केंद्रीय मार्गदर्शक आमदार एड. अभिजीत वंजारी, माजी आमदार देवरावजी भांडेकर, केंद्रीय मार्गदर्शक सुप्रसिद्ध विधितज्ञ एड. विजयजी मोगरे, संताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. व्ही. गाडेगोणे, केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. विश्वास झाडे, केंद्रीय संघटक प्राचार्य सूर्यकांत खनके, केंद्रीय संघटक श्री धानराजजी मुंगले, एल्गार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्र इटनकर, संताजी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री विकास घटे, श्री. शैलेश जुमडे, यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे