कवितादादरा नगर हवेलीनागपूरमहाराष्ट्रसाहित्यगंध
लेक ईश्वरी प्रसाद
सुजाता सोनवणे. सिल्वासा दादरा नगर हवेली
0
4
8
2
9
0
लेक ईश्वरी प्रसाद
लेक अनमोल ठेवा
चैतन्याचा शिडकावा,
स्नेह मायेचा झरा
काळजात ओलावा.
लेक अंतर्मनातील साद
साधते निःशब्द संवाद,
प्रत्येक कामात सुरेख दाद
असते लेक ईश्वरी प्रसाद.
आनंदाचे शिंपण लेक
समृद्ध लक्ष्मीचे रुप,
काळजाचा तुकडा
आईबाबांची लाडाची खूप.
लेकच असते खरी
जीवनोत्सवातील शोभा,
मायबापांनो खुडू नका कळी
तिच्यावरच अवघा संसार उभा.
फुलू द्या तिचे भावविश्व
विकासाला योग्य दिशा,
निखळ उसळतेपणाला
वाव देता उजळेल नवी उषा.
पंखात बळ भरून तिच्या
योग्य दिशेने घेऊ द्या भरारी
संवेदना जाणून लेकीच्या
द्या सुसंस्कारित मायेची उभारी.
सुजाता सोनवणे.
सिल्वासा दादरा नगर हवेली
========
0
4
8
2
9
0



