
0
4
8
2
9
4
तुझी प्रेम भाषा
तुझी प्रेम भाषा वाचून
हृदय माझे फुलून आले
उमटल्या गुलाबी प्रेमछटा
अंतर्मन रंगूनी गंधूनी गेले
शब्दविना तू बोलून जाता
वेडे मन माझे भुलले रे
प्रितीत प्रित रंग खुलता
सुंदर रेशीम नाते जुळले रे
तुझी प्रेम भाषा मजशी
डोळ्यातील तुझा संवाद रे
नजरेला नजर भिडताच
लागला तुज प्रेमाचा नाद रे
ऐक ना मला ने सागरतीरी
रम्य निसर्ग बघू मौजमस्तीत
सखया तुझ्या सहवासात
मनोमन होईन मी हर्षित
नित्य वाहू दे हा प्रितझरा
याशिवाय मला काय हवे
आयुष्यात भरूनी आनंद
हे प्रितबंध अधिक घट्ट व्हावे
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
0
4
8
2
9
4



