0
4
8
2
9
0
अवदसा
का बेवड्या वाईट,तु अवदसा केली।
दारुपायी तुझीरे ,बायको निघून गेली।।
बायको सोडीन, दारु नाही सोडणार।
शब्दही खरे झाले, तुलाच भोवणार।।
राशन अनाजाने, मस्ती खूप आली।
फुकट खाऊन,बायकोची दैना केली।।
तेला मिठाला बिचारी मजूरीले जाई।
हिसकून कमाई ,तिले मारायची घाई।।
चिलापिलं घेऊन,कधी उपाशी झोपे।
मांजर्या नष्ट करे, या चिमणीचे खोपे।।
एक दिवस नागीण होऊन फुसकारली।
बायको बाटलीले, पक्कीच हुसकावली।।
धन गेलं दौलत, माती झाली इज्जत.
बायकोले वाटलं कशाला करु हूज्जत।।
राय राय झाली, हानली एकच लाथ।
म्हणे दारुड्याला ,द्यायची नाय साथ।
या दारुपायी झाली, संसारी बरबादी।
मग पिऊन मेलं, कारटं पुरण्या आधी।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा
========
0
4
8
2
9
0



