वेदनेचा टाहो
श्रीमती,सिमादेवी निंबाजी बेडसे ग्रामपंचायत अधिकारी, चाळीसगाव

वेदनेचा टाहो
सगळ्यांच्या सुखासाठी
ती स्वतःचे सुख विसरत गेली..
दुसऱ्यांच्या हास्यामध्ये
आपली आसवे लपवत गेली…
कुणाला वाट मिळावी म्हणून
ती स्वतःची वाट हरवत गेली..
कुणाच्या आयुष्यात उजेड यावा,
म्हणून स्वतःच अंधारात जळत गेली…
स्वतःच्या माणसांच्या हक्कांवर
ती परक्यांना न्याय देत राहिली..
आपल्याच घरट्याची स्वप्ने मोडून
दुसऱ्यांची स्वप्ने सजवत राहिली…
ज्यांच्यासाठी सर्वस्व दिले
त्यांनीच पाठ फिरवली शेवटी..
ज्यांच्या डोळ्यांत आनंद पाहिला,
त्यांनीच दिली वेदनेची भेट शेवटी…
तिने कधी काही मागितले नव्हते
ना कौतुकाची अपेक्षा केली..
फक्त आपुलकीच्या दोन शब्दांची
मनापासून आस धरली…
पण तिच्या त्यागाची किंमत
कधी कुणाला कळलीच नाही..
ती आतून किती तुटली,
ही गोष्ट कुणाला दिसलीच नाही…
आता नको कुणाचा न्याय
नको कुणाकडून उपकार…
फक्त स्वतःसाठी जगायचं आहे
इतकाच उरलाय मनाचा हुंकार…
कारण दुसऱ्यांना सुख देताना
स्वतःला दुःख देणं शहाणपण नाही..
स्वतःच्या अस्तित्वाची किंमत विसरणं
ही कुठलीच माणुसकी नाही…
आजही तिचं मन रडतंय
पण डोळे शांत आहेत..
वेदनेचा हा टाहो सांगतो,
“स्वतःलाही जपणं गरजेचं आहे…”
“स्वतःलाही जपणं गरजेचं आहे…”
श्रीमती,सिमादेवी निंबाजी बेडसे
ग्रामपंचायत अधिकारी, चाळीसगाव
===========



