Breaking
अहमदनगरई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

अवसान

डाॅ. नझीर शेख राहाता जिल्हा अहिल्यानगर

0 5 9 0 3 5

अवसान

परिस्थितीवर मात कर
ढाळू नकोस आसू
आपल्या प्रारब्धावर गड्या
नकोस उगी रुसू

अवसान गाळून असं
नाही भागणार राजा
कोणत्या जन्माची तुला
मिळतेय ही सजा
अगतिकपणे स्वतःवरच
नको तुच्छतेने हसू

बदलेल कधीतरी नशीब
होईल भलं तुझं
जीवन हे जगण्यास्तव आहे
नकोस समजू ओझं
जे दुःख तुझं आहे तेच दुःख माझं
चल मिळूनी दोघे पुन्हा कंबर कसू

दुःख फक्त तुझ्याच वाट्याला
हा समज तू सोड
कित्येकांची नशीबाने
काढली रे खोड
चल पुन्हा हिरीरीने
नवे मनसुबे रचू

प्राक्तनाबरोबरच जगानेही
केली तुझी वंचना
दुर्दैवाच्या फेर्‍यांमुळे
वाढल्या तुझ्या विवंचना
आता मात्र हुशारीने वाग
नकोस पुन्हा फसू

डाॅ. नझीर शेख राहाता
जिल्हा अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 0 3 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे