लाखांदुरात शेतकऱ्यांचा भव्य पायदळ हल्लाबोल मोर्चा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांचाही सहभाग
लाखांदुरात शेतकऱ्यांचा भव्य पायदळ हल्लाबोल मोर्चा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांचाही सहभाग
भिमराव मेश्राम, तालुका प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
भंडारा/लाखांदूर: तालुक्यात 17 जुलै ते 22 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिके नष्ट झाले, अनेक कुटुंब बेघर होऊन उध्वस्त झाले. परंतु महाराष्ट्रात असलेले आंधळे बहिरे सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे काल लाखांदूर तालुक्यातील विरली बु. येथे शेतकऱ्यांसोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले तहसिल कार्यालयावर काढलेल्या भव्य पायदळ हल्लाबोल मोर्चात सहभागी झाले.
यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी १७ किलोमीटर पायी चालून सरकारच्या विरोधात आपला रोष दर्शवत हेक्टरी 50हजार रुपये नुकसनभरपाई सह अनेक मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात दिले.
या मोर्चात आमची मागणी पूर्ण करा नाही तर खुर्ची खाली करा सोबतच नानाभाऊ तुम आगे बढे हम आपके साथ है,चा जय घोषाने संपूर्ण परिसर दुम दुमले यावेळी मोर्च्यात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. श्री. प्रशांत पडोळे, माजी खासदार श्री. शिशुपाल पटले, माजी आमदार श्री. अनिल बावनकर, भंडारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. मोहन पंचभाई, गोंदिया काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार श्री. दिलीपजी बनसोड, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. गंगाधरजी जिभकाटे, सभापती श्री. मदनजी रामटेके, सभापती श्रीमती स्वातीताई वाघाये, भंडारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा श्रीमती जयश्री बोरकर, लाखांदूर तालुका काँग्रेसी कमिटी अध्यक्ष श्री. उत्तमजी भागटकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. रमेशजी डोंगरे, माजी सभापती श्री. सुरेश ब्राह्मणकर, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती रसिका रंगारी, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती विशाखाताई माटे, भंडारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. पवन वंजारी, लाखांदूर युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री. प्रकाश देशमुख, श्री. मनोहर राऊत, रक्षित मेश्राम यांच्यासह हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.



