Breaking
गुन्हेगारीगोंदियानागपूरभंडारामहाराष्ट्रविदर्भ

चाकू आणि बंदूकीचा धाक दाखवून लुटणा-या चौघांना ठोकल्या बेड्या

आरोपींना जेरबंद करण्यात गोंदिया व अर्जुनी मोरगाव पोलीस यशस्वी

0 4 8 2 9 0

चाकू आणि बंदूकीचा धाक दाखवून लुटणा-या चौघांना ठोकल्या बेड्या

आरोपींना जेरबंद करण्यात गोंदिया व अर्जुनी मोरगाव पोलीस यशस्वी

गोंदिया जिल्हा प्रतिनिधी, बिनधास्त न्यूज

गोंदिया: शहरात दिनांक 14/08/2024 रोज चे दुपारी 16.30 वाजता चे सुमारास फिर्यादी- मिनाल होमराज बहेकार वय 26 वर्षे रा. येरांडी/देवी,अर्जुनी – मोरगाव हे आपल्या मोटार सायकलने येरंडी येथुन सिलेझरी मार्गे अर्जुनी/मोर कडे येत असतांना अज्ञात तिघे आरोपी हे पल्सर मोटार सायकलने मागेहून येवून विहीरगाव फाट्याजवळ फिर्यादीस थांबवून चाकू व बंदुकीचा धाक दाखवून तुझ्याजवळ जे काही आहे ते काढून दे असे म्हणून फिर्यादीच्या हाताचे बोटातील – 1) एक सोन्याची अंगठी 06 ग्रॅम वजनाची किंमती 24,000/-रू 2) एक सोन्याची अंगठी 05 ग्रॅम वजनाची किंमती 20,000/- रू. असा एकुण किंमत 44,000/- रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला.

पो. ठाणे- अर्जुनी/मोर येथे अपराध क्रमांक- 257/2024 कलम 309(4), 3 (5) भारतीय न्याय संहिता- 2023, सहकलम 3,5 भा.ह.का.1959 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले होते. मा.वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास अर्जुनी/मोरगाव पोलिसांकडून करण्यात येत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सुध्दा सदर गुन्ह्याचे समांतर तपास करीत होते. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे- स्थागुशा पथकाने दिनांक 15/08/2024 रोजी आरोपींना अटक केली आहे.

संशयित आरोपींची नावे

1) विक्की रामकृष्ण लाडे वय 18 वर्ष रा. मुरझा ता. लाखादुर जि. भडारा 2) मनिष जयगोपाल दोनोडे वय 19 वर्ष रा. येरंडी/देवी ता. अर्जुनी/मोर जि. गोंदिया यांना नमूद गुन्हाचे अनुषंगाने ताब्यात घेवून जेरबंद करून दोन्ही संशयीतांना नमूद गुन्ह्याचे घटनेबाबत सविस्तर विचारपूस चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी आणखी दोघा आरोपीतांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरून पो. ठाणे अर्जुनी मोरगाव पोलिसांनी 3) समीर रमेश मेश्राम वय 19 वर्षे राहणार – बारव्हा, तालुका – लाखांदूर, जिल्हा – भंडारा 4) मंथन गौतम टेंभुर्णे वय 19 वर्षे राह- खोलमारा, तालुका- लाखांदूर, जिल्हा – भंडारा यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे.

चारही आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिलयाने गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे….. चारही आरोपीतांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने चारही आरोपीतांचा दिनांक 19/08/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे. गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपीतांना सखोल विचारपूस, चौकशी, तपास, गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत प्रक्रिया कायदेशीर कारवाई अर्जुनी मोरगाव पोलीस करीत आहेत….. गुन्हा उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे..

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा.श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी श्री. विवेक पाटील, पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, स्थागुशा पो.नि.श्री.कमलेश सोनटक्के, पो.ठाणे- अर्जुनी/मोर, यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार पो.हवा. तुलसीदास लुटे, इंद्रजित बीसेन, पो.शि. संतोष केदार, हंसराज भांडारकर, चा.पो.शि.खंदारे तसेच तांत्रीक सेलचे दिक्षित दमाहे, धनंजय शेंडे, रोशन येरने,संजय मारवाडे आणि पो. ठाणे अर्जुनी/ मोर येथील – पोउपनि किरण मेश्राम, रोहनकर, पो.हवा. रमेश सेलोकर, बापू येरणे, रोशन गोंडाणे, पो.शि. लोकेश कोसरे, गिरीश लांजेवार, चापोहवा भाजीपाले यांनी कामगिरी केलेली आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे