फ्युचर माईंड प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस चा अद्विक धानकुटे देशात प्रथम तर अमांश बोकडे देशात आठवा
गोटाळपांजरी नागपूरच्या फ्युचर माईंड प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस चा राष्ट्रीय डंका
फ्युचर माईंड प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस चा अद्विक धानकुटे देशात प्रथम तर अमांश बोकडे देशात आठवा
गोटाळपांजरी नागपूरच्या फ्युचर माईंड प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस चा राष्ट्रीय डंका
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर (दि ६ मार्च): गोटाळ पांझरी नागपूरच्या फ्युचर माईंड प्रोॲक्टिव्ह अबॅकस क्लासेसने अल्पावधीतच गुणवत्तेच्या जोरावर नागपूर ग्रामीण भागातील गोटाळ पांझरी, शंकरपुर, केलेल्या वेळहरी परिसरातील प्रवेश घेत आपली वेगळी ओळख निर्माण केली असून २५ फेब्रुवारी रोजी, पुणे येथे संपन्न झालेल्या प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधून जवळपास 3500 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या देशपातळीवरील स्पर्धेत गोटाड पांजरी येथील फ्युचर माइंड्स प्रोअॅक्टिव्ह अबॅकस चा विद्यार्थी अद्विक उमेश धानकुटे याने फक्त ५ मिनिटे ४९ सेकंदात ९९/१०० गणित अचूक सोडवून देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल त्याला ट्रॉफी, प्रमाणपत्र व सायकल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अमांश अमित बोकडे हा विद्यार्थी त्याच्या कॅटेगरी मधुन ८ वा रँक चा मानकरी ठरला तर आहान गौरखेडे ला त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी बेस्ट परफॉर्मर ही ट्रॉफी देण्यात आली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे फ्युचर माईंड प्रोॲक्टिव्ह अबॅकस च्या संचालिका श्वेता अमित बोकडे यांनी कौतुक केले. सर्व पालक वर्ग व गोटाळपांजरी येथील शिक्षण प्रेमींकडून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि शिक्षकांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण हे महत्त्वाचे घटक असल्याचे क्लासेसचे संचालिका श्वेता बोकडे यांनी सांगितले. अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गणिती क्षमता, एकाग्रता, स्मरणशक्ती व आत्मविश्वास लक्षणीय रीत्या वाढत असल्याचा अनुभव पालकांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवू शकतात याचे हे ज्वलंत उदाहरण ठरले आहे. भविष्यातही अशाच प्रकारे अधिका अधिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी करून त्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प फ्युचर माईंड प्रोडक्ट अबॅकस च्या संचालिका श्वेता अमित बोकडे यांनी केला.



