Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरगोंदियानागपूरपरीक्षण लेखभंडाराविदर्भसाहित्यगंध

विश्वास

संगीता रामटेके भोवते (संजीवनी) साकोली, जि.भंडारा

0 4 8 2 8 4

विश्वास

ढोणे काकू:-अगं,ती बघ, देशपांड्यांची लेक, कशी चिपकून बसली गं त्या मुलाला?
कोण आहे, देव जाणे! आजकालच्या पोरींनी लाज शरम जणू विकूनच टाकली आहे.
कावळे काकू:-तुम्ही ओळखत नाही त्याला?तो दुसरा तिसरा कुणी नाही हो. तिचा भाऊच आहे. कालच आला पुण्याहून.
ढोणे काकू:-अगं बाई! मला कुठे माहीत होते तिला भाऊ आहे आणि तो पुण्यात राहतो. मी कुणी दुसरा समजून बोलले.

काय! झाली ना गोची ढोणे काकूंची. जर कावळे काकूंनाही ठाऊक नसते मुलीच्या भावाबद्दल, तर त्यांनी सर्रास तिला कुणा ति-हाईतासोबत फिरते म्हणून नाव ठेवले असते. म्हणजे जग सख्ख्या बहिणभावाला अविश्वासाने बघतो तर मग मानलेल्या नात्यांचं काय? त्या नात्याला परीक्षाच द्यावी लागणार.आणि कितीही परीक्षा दिल्या तरी मनोग्रह मिटेल या गोष्टीची शाश्वती नाही.

बरं हे मोठ्या मुलांबाबत झालं. लहान मुलांचं काय? खूपदा एखाद्या सामूहिक सोहळ्यात शेजार पाजारची लहान मुले एकत्र खेळतात. ती अजाण मुले असतात तिन चार वर्षाची. त्यांना फक्त एवढी जाण असते की, ही फ्राॅक घालते म्हणून ही मुलगी, आणि त्याने पॅंट शर्ट घातला कि तो मुलगा किंवा आईने तिला मुलगी/मुलगा म्हणून म्हणून संबोधले यावरून मुलगा किंवा मुलगी ही संकल्पना पूर्ण करत ते एकमेकांसोबत खेळतात. खेळतांना त्यांचा स्पर्श एकमेकांना होतो. पडता उठताना कुठेही स्पर्श होतो. मग आईवडीलांनी त्यांना चांगल्या वाईट स्पर्शाबद्दल सांगायचे का? पण ते तर लहान आहेत. त्यांना नाही स्पर्श समजत, नाही मुलामुलींतला भेद. अशा वयात त्यांना चांगला स्पर्श किंवा वाईट स्पर्श याबाबत कसे सांगायचे? या वयात पालकांनी त्यांना त्यांच्या शारीरिक अंगाची जाणीव करून दिली तर ठीक. परंतु स्पर्श वाईट की चांगला हे लहान लेकरू नाही सांगू शकत.

एकाच घरातले सख्खे,चुलत म्हणजे रक्ताच्या नात्यातील लोकांवर आपण डोळे मिटून विश्वास ठेवतो. नाही आपल्याच परिवारातील मुले आहेत राहू देत, खेळू दे एकत्र. शेजारच्या मुलांवर ठेवणार का विश्वास? जरी ते जन्मापासून तुमच्या नजरेसमोरून येतात, जातात, तुमच्याच मुलांमुलींसोबत खेळतात , ते सुद्धा अजाणत्या वयातील आहेत मग त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो का? की त्यांचा खेळताना जर कुठे स्पर्श झाला तर त्याच्या किंवा तिच्या आईवडिलांना सांगतो कि याने/हिने इथे स्पर्श केला. मी तरी लहान लेकरांत असं बघितलं नाही.

परंतु असं जर घडत असेल, तर लेकरांना चांगल्या वाईट स्पर्शाबद्दल सांगण्यापेक्षा त्याला स्वतःच्या नजरेसमोर ठेवणे योग्य राहील. कारण सात आठ वर्षाची मुलगी चांगला स्पर्श वाईट स्पर्श ओळखून सांगू ही शकेल. परंतु तीन चार वर्षाची मुलगी नाही समजू शकणार. आमच्या परीच उदाहरण घ्या. म्हणजे आहे तीन वर्षाची परंतु आमच्या सांगण्यामुळे ती कुणाला स्पर्शच करू देत नाही. कुणाकडे फिरायला जातांना सोबत आली तर ती त्या घरातील लोकांच्या जवळ बसून खेळते पण स्पर्श करू देत नाही.मग ते स्त्री असो किंवा पुरुष किंवा वयोवृद्ध आजी आजोबा. फक्त घरच्या लोकांना जवळ येऊ देते. स्पर्श करू देते. बाकी कुणालाही नाही.

असं म्हटलं जातं की, मुलगी ही काचाचं भांडं असते आणि तिच्या वाटेवरती काचा असतात.यासाठी हा आधीच केलेला उपाय आहे. It’s like precautions is better than cure. बस ही सावधानी बाळगताना तुम्ही कुणा जवळच्या व्यक्तिवर अविश्वास दाखवू नका. नाहीतर माणुसकी अविश्वासाच्या पायदळी तुडवली जाऊ शकते. ते नको व्हायला.परंतु आजकाल माणसातली माणुसकी, संस्कृती लयास लागलेली आणि विकृती वाढत चाललेली म्हणून good touch,bad touch हे सांगणं योग्य आहे.फक्त खूप लहान वयात तुम्ही जे बोलता ते नीट न समजल्यामुळे प्रत्येक गोष्टीला मुलं दुजोरा देत राहिले तर एखाद्या वर नामुष्कीची वेळ येऊ शकते. म्हणून चौकशी जरा जपून करा. आपल्या माणसांना जपा.आणि माणुसकीही जपा.

माझी सोनुली, बाहुली
परी लाडकी आहे,
जग रहाटीचे धडे
मी तुला देणार आहे
मोठी होईस्तोवर
मी तुला जपणार आहे
जगरहाटीचे धडे
मी तुला देणार आहे….

संगीता रामटेके भोवते
(संजीवनी)
साकोली, जि.भंडारा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे