
0
5
9
4
1
4
आईचा विश्वास
आईचा विश्वास बाळासाठी ,
कधीच कोणावर बसेना .
बाळाच्या काळजी ने,
ती कुठेच विसावेना.
दिवस रात्र , उटता बसता,
एकच तिची धडपड असते.
बाळ सुरक्षित आहे का नाही,
याचीच मनात धडधड बसते.
हातातला घास सोडून ती
लेकराच्या मागे पळते.
बाळाच्या चेहऱ्यावरील प्रत्येक,
भाव आईलाच कळते.
त्याच हसणं, रुसणं खेळणं,
सारखी मनात टिपते.
हजार अडचणी सोडून,
त्याला जीवापाड जपते.
त्याची खोडी उनाडकी झेलून,
मनात ती झुरत असते.
त्याचा हावभाव ,नावीन्य
उरात तिच्या मूरत असते.
बाळाचे विश्व म्हणजेच,
आईचा विश्वास होय .
बाळाची सुरक्षितता,
हेच आईचा श्वास होय.
बेबी /अनु विठ्ठलराव बोईनवाड
ता. जिल्हा नांदेड.
=========
0
5
9
4
1
4



