Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

जीवनाची शाळा

पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे

0 5 1 7 5 8

जीवनाची शाळा

जीवनाची शाळा भरते
दररोज इथे निरंतर
जीवन म्हणजे काय
कळते जीवन जगल्यानंतर

कोरी पाटी मनाची
कागद नशिबाचा कोरा
जगण्याची धडपड भारी
काळाहाती भविष्याचा दोरा

बरे वाईट क्षण सारे
असतात अनुभवी गुरू
तरी जीवन जगण्याची
कसरत असते सुरू

कर्माचा लेखजोखा सारा
ठरतो भविष्याची नांदी
प्रारब्ध सारे लिखित
ठाऊक नसते यादी

जीवनाच्या या शाळेत
घ्यावे जगून मनसोक्त
मोहमायेच्या जंजाळात
होऊच नये आसक्त

पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे